Corona Updates: दिलासादायक! देशात 90 लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 December 2020

सध्या देशात कोरोनाचे 4 लाख 16 हजार 82 रुग्ण उपचार घेत आहेत.

नवी दिल्ली: मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 36 हजार 594 रुग्णांचं निदान झालं असून 540 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे  95 लाख 71 हजार 559 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर देशात 1 लाख 39 हजार 188 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सध्या देशात कोरोनाचे (COVID19) 4 लाख 16 हजार 82 रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत कोरोनाचे 90 लाख 16 हजार 289 रुग्ण बरे झाले आहेत. तर मागील 24 तासांत 42 हजार 916 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुरुवारी देशात कोरोनाच्या 11 लाख 70 हजार 102 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनाच्या 14 कोटी 47 लाख 27 हजार 749 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून मिळणार लस-
कोरोना विषाणूविरोधातील युद्धात ब्रिटनने ऐतिहासिक घोषणा केली. फायझर बायोटेकच्या कोरोनावरील लशीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. पुढील आठवड्यात सामान्य लोकांना ही लस उपलब्ध करुन दिली जाईल. भारतासह 180 देशांत कोरोनावरील लशीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. 

जगभरात कोरोनामुळे सुमारे 6.4 कोटींहून अधिक जण बाधित झाले आहेत. तर ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 16 लाखांहून अधिक जण बाधित झाले आहेत. याचदरम्यान ब्रिटनमध्ये आता सामान्य लोकांसाठी कोरोना विषाणूवरील लशीला मंजुरी मिळाली आहे. फायझर/बायोएनटेक कोरोना लशीला सामान्य लोकांना वापरण्यास परवानगी दिली आहे. आता लवकरच ब्रिटनमध्ये सामान्य लोकांना कोरोना लस दिली जाईल.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona recovered cases reaches 90 lakh