Corona Update : देशात २४ तासात कोरोनाचे ९०,९२८ रुग्ण; ओमिक्रॉनचे एकूण रुग्ण २६३० | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यात ओमिक्रॉन या नव्या व्हेरिअंटच्या रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे.

देशात २४ तासात कोरोनाचे ९०,९२८ रुग्ण; ओमिक्रॉनचे एकूण रुग्ण २६३०

देशभरात कोरोनाचा कहर सुरुच असून तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. मागील 24 तासात देशात 90 हजार 928 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत ही गंभीर बाब समोर आली आहे. दुसऱ्या लाटेनंतरची सर्वाधित आकडेवारी आहे. येणाऱ्या काळात ही संख्या वाढल्यास तिसऱ्या लाटेचा फटका देशाला बसू शकतो.

देशातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तसंच गेल्या चोवीस तासात देशभरात 19 हजार 206 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट 6.43 टक्क्यांवर गेला आहे. तर, आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 82 हजार 876 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 2 लाख 85 हजार 401 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशातील 3 कोटी 43 लाख 41 हजार 009 रुग्ण कोरोनातून रिकव्हर झाले आहेत.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यात ओमिक्रॉन या नव्या व्हेरिअंटच्या रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. सध्या देशात ओमिक्रॉनचे २६३० रुग्ण आहेत. सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात ७९७ इतके आहेत. त्याखालोखाल दिल्लीत ४८५ तर राजस्थानात २३६ रुग्ण आहेत. केरळमध्ये २३४, गुजरातमध्ये २०४ आणि तामिळनाडुत १२१ ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirusomicron
loading image
go to top