Corona Update: कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली; गेल्या 24 तासांत 137 जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 30 January 2021

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 13,083 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 137 लोकांचा बळी गेला आहे. गेल्या 24 तासात 14,808 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,07,33,131 झाली आहे. आतापर्यंत 1,04,09,160 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत 1,54,147 लोकांचा जीव घेतला आहे. अनेक लोक कोरोनावर मात करत असून देशात 1,69,824 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात 19,58,37,408 कोरोना टेस्ट घेण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 7,56,329 चाचण्या घेण्यात आल्याची माहिती ICMR ने दिली. 

देशात कोरोना लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत जवळपास 30 लाख लोकांना कोरोनाचा डोस देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 2 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 16 जानेवारीला सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत सर्वातआधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्संना लस देण्यात येईल. देशात जवळपास 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स असल्याची माहिती आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India reports new COVID19 cases discharges deaths Union Health Ministry