corona
coronacorona

दिवसभरात 3.62 लाख नवे रुग्ण, मृत्यू 4 हजारांहून जास्त

Published on
Summary

एका बाजुला नव्या रुग्णांची संख्या स्थिर आणि मृतांची संख्या वाढत असली तरी दुसऱ्या बाजुला कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे.

भारतात (India) कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येचा आलेख दर दिवशी वर खाली होत असल्याचं दिसत आहे. बुधवारी दिवसभरात भारतात 3 लाख 62 हजार 727 नवीन रुग्ण (Corona New Cases) आढळले आहेत. एका बाजुला नव्या रुग्णांची संख्या स्थिर आणि मृतांची संख्या वाढत असली तरी दुसऱ्या बाजुला कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. गेल्या 24 तासात 3 लाख 52 हजार 181 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या चार हजारांच्यावर आहे. गेल्या 24 तासात 4 हजार 120 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. (Corona Update India today new cases 3 lakh 62 thousand and death 4 thousand)

देशात आतापर्यंत एकूण 2 कोटी 37 लाख 3 हजार 665 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 कोटी 97 लाख 34 हजार 823 जणांनी कोरोनावर मात केली आहे. भारतातील कोरोना मृत्यूची संख्या 2 लाख 58 हजार 317 वर पोहोचली असून सध्या देशात 37 लाख 10 हजार 525 सक्रीय रुग्ण आहेत.

corona
प्रतिमा नव्हे,जीव महत्त्वाचे;अनुपम खेर यांची केंद्रावर टीका

सोमवारी देशात 3 लाख 29 हजार तर मंगळवारी दिवसभरात 3 लाख 48 हजार 421 नवीन रुग्ण आढळले होते. देशात कर्नाटकनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात काल दिवसभरात 46 हजार 781 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 58 हजार 805 रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या 24 तासांत राज्यात 816 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com