Omicron New Variant: 'BF.7' सब व्हॅरिएंटवर जुनी लस किती प्रभावी? वाचा धक्कादायक खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron New Variant

Omicron New Variant: 'BF.7' सब व्हॅरिएंटवर जुनी लस किती प्रभावी? वाचा धक्कादायक खुलासा

Omnicron News variant: गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने जगभऱ्यात थैमान घातलेले आहे. थोडीफार परिस्थिती आटोक्यात येत नाही तर परत चीनमध्ये रूग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. अनेकांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत. मात्र आता नव्या व्हॅरिएंटचे वाढते रूग्ण बघून आपण घेतलेली लस नव्या व्हॅरिएंटशी लढण्यास कितपत प्रभावी ठरेल असा प्रश्न अनेकांना पडलाय.

जुनी लस BF.7 सब व्हॅरिएंटवर किती प्रभावी ठरेल ते आपण जाणून घेऊया.

BF.7 वर जुनी लस किती प्रभावी?

सेल होस्ट आणि माइक्रोब जनरलच्या अभ्यासानुसार BF.7 हा सब व्हेरिएंट लसीमुळे शरीरात उत्पन्न होणाऱ्या अॅंटिबॉडीला (Antibody) चकवा देऊ शकतो. BF.7 व्हेरिएंटमध्ये कोरोना विषाणूच्या पहिल्या व्हेरिएंटपेक्षा 4.4 पट अधिक प्रतिकारशक्तीआहे. लसीमुळे लोकांच्या शरीरात अँटिबॉडि तयार झाले असले तरी हा विषाणू त्यांना संक्रमित करु शकतो.

बीएफ-7 ची 'R' व्हॅल्यू जास्त

BF.7 ची 'R' व्हॅल्यू 10 ते 18 च्या दरम्यान आहे. याचा अर्थ BF.7 ची लागण झालेला व्यक्ती आपल्या आसपासच्या किमान 10 ते 18 लोकांना संक्रमित करु शकतो. जागतिक आरोग्य संस्थेनेही (WHO) आतापर्यंतच्या व्हेरिएंटपेक्षा BF.7 व्हेरिएंटचा आर व्हॅल्यू सर्वाधिक असल्याचं सांगितलं आहे. याआधीच्या अल्फा व्हेरिएंटची आर व्हॅल्यू 4-5 आणि डेल्टा व्हेरिएंटची आर व्हॅल्यू 6-7 इतकी होती. (Covid-19)

R व्हॅल्यू म्हणजे काय?

आर नंबर हा कोरोनाव्हायरस किंवा कोणत्याही रोगाच्या पसरण्याच्या क्षमतेचे रेटिंग करण्याचा एक मार्ग आहे.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

BF.7 चा भारताला किती धोका?

भारतात या व्हेरिएंटचा अद्याप धोका नाही. पण तरीही प्रत्येकाने खबरादारी घेण्याची गरज आहे. कोविड नियमावलीचं पालन करण्याबरोबरच सावध राहण्याची आवश्यकता आहे. या व्हेरिएंटचे रुग्ण भारतात आढळले असले तरी अद्याप 4 ते 5 प्रकरणंच समोर आली आहेत. केंद्र सरकारने कोविड नियमावली जारी केली आहे.