esakal | पूर्वनोंदणीशिवाय लस, वशिलेबाजांचं फावणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

पूर्वनोंदणीशिवाय लस, वशिलेबाजांचं फावणार का?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली. याआधी लस घेण्यासाठी नागरिकांना कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य होते. त्यानंतर लस घेण्याची वेळ आणि ठिकाण निश्चित करता येत होते. पण, आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केंद्रावर किंवा वॉल इन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. असे असले तरी ही सुविधा केवळ सरकारी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असणार आहे. खासगी लसीकरण केंद्रावर तुम्हाला कोविन ऍपवर रजिस्ट्रेशन करुन अपॉईंटमेंट घ्यावी लागणार आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (corona vaccination no need for registration on cowin)

लसीकरण सुरु झाल्यापासून काही केंद्रावर लस वाया जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. कोविन ऍपवर रजिस्ट्रेशन केलेले नागरिक अनेकदा लसीकरणासाठी केंद्रावर येत नाहीत. अशावेळी लशीचा वापर होत नाही किंवा त्या तशाच पडून राहतात. या पार्श्वभूमीवर लशीचा आणि वेळेचा पुरेपुर वापर करण्यासाठी ऑन-साईट किंवा वॉल्क-इन लसीकरण सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. असे असले तरी या सुविधेचा गैरवापर आरोग्य कर्मचारी किंवा स्थानिक नेत्यांकडून होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा, रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना टाळून इतरांना लस दिली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: ओडिशाला 600, बंगालला 400 कोटी मदत; राज्यांसोबत भेदभाव!

कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण सुरु करण्यात आले. पण, लसीकरणाचा वेग संथ असल्याची टीका होत आहे. देशात सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, 45 वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लशीची कमतरता असतानाही 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. आता परिस्थिती अशी आहे की 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लस मिळत नाहीये. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचे लसीकरणासंबंधी नियोजन बिघडले असं आपल्याला म्हणता येईल.

loading image
go to top