कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणार कोरोनाचं निदान; ‘XraySetu’ॲप विकसित

corona testing
corona testingcorona testing

नवी दिल्ली : कोरोनाच्या आरटीपीसीआर किंवा ॲंटिजेन चाचणीला आणखी पर्याय शोधण्याचा प्रयत्न होत आहे. बंगळूरमधील एका स्टार्टअपने डॉक्टरांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कोरोनाचे विनामूल्य निदान करणारी चाचणी विकसित केली आहे. डॉक्टरांना कमी रिझोल्युशनची छातीच्या एक्स-रे छायाचित्रे व्हॉट्‌स ॲपद्वारे पाठवावी लागतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने याबाबत माहिती दिली.

‘एक्स-रे सेतू’ या ॲपच्या माध्यमातून ग्रामीण भागात सहजतेने व त्वरेने कोरोना चाचणी करता येईल. डॉक्टरांना छातीच्या एक्स-रे च्या माध्यमातून कोरोनाचे जलद निदान करण्यासाठीही याचा उपयोग होईल. बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्थेने विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने ‘एआरटीपीएआरके’ (एआय ॲंड रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क) हा ना नफा तत्वावर उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी, बंगळूरमधील आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप ‘निरामय’चेही सहकार्य लाभले. त्यातून संयुक्तपणे एक्स-रे सेतू हा वैशिष्ट्यपूर्ण प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. व्हॉट्‌स ॲपवरून पाठविलेले कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या कमी रिझोल्युशनच्या एक्स-रेवरूनही कोरोनाचे निदान करता येते. आत्तापर्यंत देशात या माध्यमातून १,२०० चाचण्या केल्या आहेत.

Corona Test
Corona Testesakal

गेल्या दहा महिन्यांत ग्रामीण भागातील ३० हून अधिक डॉक्टरांनी यशस्वीरित्या ‘एक्स-रे सेतू’ ॲपचा वापर केला आहे. कोरोनाशिवाय फुफ्फुसाशी संबधित न्यूमोनिया, क्षयरोग आदी १४ आजारांचे निदानही करता येते.

चाचणीसाठी काय करावे लागेल?

कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांना www.xraysetu.com या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर, Try the Free XraySetu Beta वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, दुसरे पान उघडेल. त्यानंतर, स्मार्टफोन ॲप किंवा वेबच्या माध्यमातून व्हॉट्‌स ॲपवर आधारित चॅटबोटचा पर्याय निवडावा लागेल. डॉक्टरांना एक्सरे सेतू सुविधेचा लाभ घेण्यासाठी ८०४६१६३८३८ या व्हॉट्‌स ॲपवर क्रमांकावर संदेश पाठवावा लागेल. रुग्णाचे एक्स रे पाठविल्यावर काही मिनिटांतच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चाचणीचा दोन पानी अहवाल पाठविला जाईल.

९८.८६ टक्के अचूकता

भारतात एक्सरे सेतू ॲपमधून १,२०० जणांची कोरोना चाचणी झाली असून ब्रिटनमधील सव्वा लाखांहून अधिक एक्स रे छायाचित्रांच्या माध्यमातून चाचणी केली. यावेळी, चाचणीची संवेदनशीलता ९८.८६ टक्के व अचूकता ७४.७४ टक्के आढळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com