ऑफिसच्या झूम मिटींगला मास्क बंधनकारक? व्हायरल सत्य जाणून घ्या|Viral Mail | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zoom-meeting
ऑफिसच्या झूम मिटींगला मास्क बंधनकारक? व्हायरल सत्य जाणून घ्या|Viral Mail

ऑफिसच्या झूम मिटींगला मास्क बंधनकारक? व्हायरल सत्य जाणून घ्या

कोरोनाच्या केसेस सध्या वाढत आहेत. त्यादरम्यान एका मेलचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे. एका बॉसने (Boss) आपल्या टीमला पाठवलेला हा मेल आहे. टीममधील एका महिला सहकारी मास्क(Mask न घातलेल्या लोकांना घाबरते, त्यामुळे ऑफिसच्या (Office) झूम मिटिंग दरम्यान मास्क घालावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Office Colleagues अन् रिलेशन; कोणत्या गोष्टी असतात मोलाच्या?

हा मेल बघून लोक वैतागले आहेत. ही कोणती कंपनी आहे हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या नावाखाली कंपनी कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकं ‘#COVIDIOTS या हॅशटॅगने या इमेलचा स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. एका फेसबुक युझरने हा मुर्खपणा असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: ऑफिसमध्ये स्वत:ला सिद्ध करायचंय? 'या' पाच टिप्स फॉलो करून पहा

गमतीची पोस्ट

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मेल काल्पनिक आहे. इमेल zactokz टिकटॉक युझरने तो तयार केला आहे. पूर्ण पोस्ट वाचल्यावर लोकांना यातली मजा लक्षात आली. टिकटॉक अकाऊंटच्या बायो सेक्शनमध्ये त्यात टाकलेले सर्व व्हिडिओ व्यंगात्मक आहेत, हे स्पष्टपणे लिहिले आहे. त्याने याविषयी तीन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. पहिला व्हिडिओ त्याने ३१ डिसेंबर २०२१ ला शेअर केला. त्यावेळी बॉसने कसा मास्क घालणे बंधनकारक केले आहे ते सांगितले. त्यानंतर व्हिडिओत मार्ग काढण्याविषयी चर्चा झाली. तिसऱ्या व्हिडिओत मास्क घालावा लागणारे हे स्पष्ट झाले. पण, लोकांना नंतर यातली मजा लक्षात आली. हा व्हिडिओ मग अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला.

हेही वाचा: ऑफिसचे E-Mails घरी आल्यावरही चेक करताय! होईल मानसिक त्रास

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top