India Coronavirus Update: कोरोनानं पुन्हा वाढवली धाकधूक; एक दिवसात देशात आढळले तब्बल 'इतके' नवे रुग्ण

देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) मोठ्या प्रमाणात फैलाव होऊ लागलाय.
coronavirus situation in india
coronavirus situation in indiaesakal
Summary

सध्या देशात 65,286 लोक कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) मोठ्या प्रमाणात फैलाव होऊ लागलाय. आज एकाच दिवसात कोरोना विषाणूचे 12 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्याही 65 हजारांच्या पुढं गेली आहे.

भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 12,591 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4.48 कोटी झाली आहे.

coronavirus situation in india
Karnataka Election : काँग्रेसनं 91 वर्षाच्या वयस्कर उमेदवाराला दिलं तिकीट; शिवशंकरप्पा म्हणाले, मी तगडा घोडा..

गेल्या आठ महिन्यांत नोंदवलेल्या दैनंदिन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्याच वेळी, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 65,286 वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या संसर्गामुळं 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात संसर्गाचा दैनंदिन दर 5.46 टक्के आहे, तर साप्ताहिक दर 5.32 टक्के आहे.

coronavirus situation in india
Coronavirus : चिनी लोकांना कोविड निर्बंधातून मुक्त करणाऱ्या दोन महिलांची तुरुंगातून सुटका

सध्या देशात 65,286 लोक कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी 0.15 टक्के आहे. भारतातील रुग्णांचा बरं होण्याचा राष्ट्रीय दर 98.67 टक्के आहे.

देशात आतापर्यंत एकूण 4,42,61,476 लोक संसर्गमुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळं मृत्यूचं प्रमाण 1.18 टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com