esakal | क्षणात कोरोना चाचणी, सिप्लाचं 'ViraGen' बाजारात; आजपासून विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

corona Test

सिप्लाचं 'ViraGen' बाजारात; आजपासून विक्री

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूला रोखू शकणारे औषध शोधण्यावर संपूर्ण जगभरात संशोधन सुरु आहे. परंतु, अद्यापही संशोधकांना त्यामध्ये यश आलेलं नाही. कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरणाऱ्या कोणत्याही ठोस औषधाची निर्मिती सध्यातरी झालेली नाही. मात्र, या विषाणूविरोधात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या लसी काही कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. तसंच काही टेस्टिंग कीटही आता बाजारात उपलब्ध झाले आहेत. यामध्येच सिप्ला (cipla) या प्रसिद्ध कंपनीने RT-PCR टेस्ट कीट बाजारात आणली आहे. आजपासून ही टेस्ट कीट ग्राहकांना वापरता येणार आहे. (coronavirus-cipla-s-real-time-covid19-testing-kit-viragen-to-be-sold-from-today)

प्रसिद्ध औषध निर्मिती कंपनी सिप्लाने 'ViraGen' ही टेस्ट कीट बाजारात दाखल केली आहे. गेल्या आठवड्यात ही कीट लाँच करण्यात आली होती. त्यानंतर आता आजपासून ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

"कोविड-१९ विरोधात लढा देण्यासाठी सिप्ला कंपनी सातत्याने प्रयत्न करत आहे. सध्याच्या संकट काळात देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत योग्य सुविधा पोहोचावी व कोविडचं निदान व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत", असं कंपनीनेच मॅनेजिंग डायरेक्टर उमंग वोहरा म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "या कीटच्या माध्यमातून कोविडची लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासावरुन कोविडचा अंदाज लावता येऊ शकतो. या कीटमधून कोविड व्हायरसच्या न्युक्लिक अॅसिड अम्लाची गुणवत्ता पाहिली जाते."

दरम्यान, ViraGen हा सिप्ला कंपनीचा तिसरी कोवि़ड टेस्टींग कीट आहे. या कीटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मान्यता दिली आहे.