esakal | नऊ राज्यांसाठी गूड न्यूज; कोरोना संसर्गाची गती थांबली
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

नऊ राज्यांसाठी गूड न्यूज; कोरोना संसर्गाची गती थांबली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली- देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. विशेष करुन महाराष्ट्र, यूपी, दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगाना, झारखंडसह केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णांच्या (Covid-19) संख्येत वाढ पाहायला मिळाली होती, पण सध्या कोरोनाच्या संक्रमणाच्या गतीमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच कोरोना रुग्णसंख्याही कमी झाली आहे. (Coronavirus Covid 9 states have slow trasmission patient)

आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय की, 12 राज्यांमध्ये कोविड-19 चे एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. सात राज्यांमध्ये 50 हजार ते 1 लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशातील 24 राज्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर 15 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर 9 राज्यांमध्ये हा दर 15 टक्क्यांपेक्षा कमी आहे. कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि ओडिशा यांचा 9 राज्यांमध्ये समावेश आहे, जेथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

हेही वाचा: अशी लक्षणे दिसताच घ्या डाॅक्टरांचा सल्ला; कोरोना होईल बरा

देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. केंद्र सरकार जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर जोर देत आहे. लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहूजा यांनी सांगितलं की, जवळपास 12 लाख लोकांना ज्यांचे वय 18 ते 44 वर्षाच्या दरम्यान आहे, त्यांना लशीचा पहिली डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात 16.50 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.

हेही वाचा: पुण्यात कोरोना नियंत्रणात

देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी (Covid-19 patient) ४ लाखाचा आकडा ओलांडला आहे. चार लाखाचा टप्पा ओलांडण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या २४ तासात देशभरात ४ लाख १४ हजार १८८ इतके नवे रुग्ण आढळले आहेत. तर गुरुवारी (ता.६) दिवसभरात ३ हजार ९१५ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तसेच ३ लाख ३१ हजार ५०७ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.