India Coronavirus Updates:देशातील फैलावलेला कोरोनाओमिक्रॉनचा सबव्हेरियंट; आरोग्य विभागाची महत्वाची अपडेट | Breaking Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking Marathi News Coronavirus News Updates

Coronavirus News Updates: देशातील फैलावलेला कोरोना ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट; आरोग्य विभागाची महत्वाची अपडेट

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या केसेसमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं चित्र आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयामध्ये वारंवार बैठका होत आहेत.

कालच पंतप्रधान मोदींनी देखील यासंदर्भात बैठक घेतली होती. दरम्यान, आज आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषद घेत देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत महत्वाची माहिती दिली. (Coronavirus current corona virus in India is a sub variant of Omicron Imp Update from Health Department)

आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, भारतात सध्या सर्व प्रसार झालेले कोरोना विषाणूचे प्रकार हे ओमिक्रॉनचे उपप्रकार आहेत.

ज्या आठ राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत त्यात महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणती कारवाई करण्याची आवश्यकतेबाबत मी 16 मार्च रोजी वैयक्तिकरित्या या राज्यांना पत्र लिहिले होतं.

दरम्यान, आत्तापर्यंत जगभरातील कोविडच्या एकूण प्रकरणांपैकी 1 टक्के प्रकरणं भारतात नोंदवली गेली आहेत. सध्या भारतातील अॅक्टिव्ह केसेस 7,600 वर आहेत. दररोज सरासरी 966 प्रकरणे नोंदवली जात आहेत. (Marathi Tajya Batmya)

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दररोज सरासरी १०८ प्रकरणे नोंदवली जात होती, ती आता ९६६ वर पोहोचली आहे, अशी माहितीही केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.