Coronavirus: परदेशी प्रवाशांनी चिंता वाढवली! बिहारमध्ये चार जण आढळले पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

Coronavirus: परदेशी प्रवाशांनी चिंता वाढवली! बिहारमध्ये चार जण आढळले पॉझिटिव्ह

पटना : कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं असताना भारतात दाखल झालेल्या परदेशी प्रवाशांनी चिंता वाढवली आहे. कारण बिहारमध्ये चार परदेशी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशात कोरोनाची नियमावली पुन्हा एकदा पाळण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यात याता या नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळं चिंतेत भर पडली आहे. (Coronavirus Four foreigners have tested positive for COVID 19 at Gaya airport)

एएनआयच्या वृत्तानुसार, गया इथल्या विमानतळावर दाखल झालेल्या चार परदेशी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये तीन जण म्यानमारचे रहिवासी आहेत तर एक जण बँकॉकचा आहे. या चौघांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी या रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत. त्यामुळं त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे, गयाचे सिव्हिल सर्जन रंजन कुमार सिंह यांनी ही माहिती दिली.