कोरोना एक जीव, त्याला जगू द्या; भाजप नेत्याने तोडले अकलेचे तारे

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते त्रिवेंद्रसिंह रावत म्हणतात की, कोरोना एक प्राणी आहे, मग त्याचे आधार कार्ड / रेशन कार्डदेखील असेल का?
Trivendra Singh Rawat
Trivendra Singh RawatFile photo
Summary

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते त्रिवेंद्रसिंह रावत म्हणतात की, कोरोना एक प्राणी आहे, मग त्याचे आधार कार्ड / रेशन कार्डदेखील असेल का?

डेहराडून : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Second wave) अक्षरश: थैमान घातले आहे. लसीकरण, ऑक्सिजन, हॉस्पिटलमध्ये बेड अशा अनेक प्रश्नांचा सामना सर्व भारतीय करत आहेत. कोरोनाशी (Coronavirus) सुरू असलेल्या या युद्धात सर्वजणांनी पुढाकार घेतला आहे. पण उत्तराखंडच्या (Uttarakhand) माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांचा संताप अनावर झाला आहे. (Coronavirus has right to live like us says Ex-CM and BJP leader Trivendra Singh Rawat)

'कोरोना व्हायरस हा सुद्धा एक जीव आहे, आणि त्यालाही जगण्याचा अधिकार आहे,' असं वक्तव्य उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांणा उधाण आलं आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप व्हायरल होऊ लागला असून नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

Trivendra Singh Rawat
Petrol-Diesel Price : दिल्ली-मुंबईत रेकॉर्डब्रेक दराने विक्री

रावत म्हणाले की, 'कोरोना व्हायरस हा देखील एक जीव आहे. इतरांसारखा त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. पण आपण मनुष्य स्वत:ला खूप बुद्धिमान समजतो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कोरोना स्वत:मध्ये वारंवार बदल करत आहे. मानवाने सुरक्षित राहण्यासाठी व्हायरसच्या पुढे जाणं गरजेचं आहे.'

रावत यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियात त्यांना ट्रोल करण्यास सुरवात झाली आहे. देशात कोरोनाने धुमाकूळ घातला असून अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. पण मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानं नेटकऱ्यांना संताप अनावर झाला आहे.

Trivendra Singh Rawat
आसाममध्ये १८ हत्तींचा मृत्यू; वीज कोसळल्याने घडली दुर्घटना

काँग्रेस नेते गौरव पंधी म्हणाले की, आपल्या देशाला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. अनेकजण या संकटाचा सामना करत आहेत. अशा व्यक्तींच्या वक्तव्यामुळे आश्चर्य वाटू नये. तर एका ट्विटर वापरकत्याने म्हटले आहे की, कोरोनाला सेंट्रल व्हिस्टामध्ये आश्रय द्यायला हवा. तर युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास म्हणाले की, 'माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते त्रिवेंद्रसिंह रावत म्हणतात की, कोरोना एक प्राणी आहे, मग त्याचे आधार कार्ड / रेशन कार्डदेखील असेल का?'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com