esakal | कोरोनाचा 'ताप' ओसरला, 24 तासांत देशभरात 14 हजार रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा 'ताप' ओसरला, 24 तासांत देशभरात 14 हजार रुग्णांची नोंद

कोरोनाचा 'ताप' ओसरला, 24 तासांत देशभरात 14 हजार रुग्णांची नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

coronavirus Update : हळूहळू देशातील कोरोना महामारीचं प्रमाण कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना माहामारीची दुसरी लाट ओसरली असून नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांत देशात 14 हजार 313 नवे रुग्ण आढळले आहेत. मागील 224 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढलं आहे. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट 98.04 इतका झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 14 हजार 313 नवे रुग्ण आढळलेत. तर 181 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 26,579 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण वाढल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,14,900 इतकी झाली आहे. 212 दिवसांतील ही सर्वात कमी सख्या आहे.

देशातील कोरोना स्थिती -

एकूण कोरोना रुग्ण - 3,39,85,920

उपचाराधीन रुग्ण - 2,14,900

एकूण कोरोनामुक्त 3,33,20,057

एकूण मृत्यू - 4,50,963

एकूण लसीकरण - 95,89,78,049

24 तासांतील लसीकरण - 65,86,092

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे दिवसाचा आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेटही घटला आहे. देशातील कोरोना रुग्णाचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 1.48 टक्के तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 1.21 टक्के इतका आहे. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परिणामी देशातील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचं चित्र आहे.

loading image
go to top