esakal | 24 तासांत देशात 38,164 नवे रुग्ण; 499 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

24 तासांत देशात 38,164 नवे रुग्ण; 499 जणांचा मृत्यू

24 तासांत देशात 38,164 नवे रुग्ण; 499 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Coronavirus in india, covid-19, latest updates : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. देशात दररोज वाढणारी कोरोना आकडेवारी स्थिरतेकडे जाऊनही घटली असल्याचं दिसत नाही. दोन आठवड्यांपासून कोरोनाच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 38,164 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 38,660 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत 499 जणांचा मृत्यू झाला. एप्रिल आणि मेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक होता. त्यावेळी दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत होती. सध्या कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडा 30 हजारांहून अधिक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जुलैच्या गेल्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा कमी झाला नाही. सध्याचा देशाचा रिकव्हरी रेट 97.32 टक्केंवर पोहचला आहे.

देशातील कोरोना स्थिती -

एकूण रुग्ण Total cases: 3,11,44,229

उपचाराधीन रुग्ण Active cases: 4,21,665

कोरोनामुक्त Total recoveries: 3,03,08,456

एकूण मृत्यू Death toll: 4,14,108

एकूण लसीकरण Total vaccination: 40,64,81,493

हेही वाचा: पवार-मोदी भेटीमुळे काँग्रेस बॅकफूटवर; नव्या समीकरणाची चर्चा

देशाचा आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा कमी आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.08 टक्के इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 2.61 टक्के इतका आहे. मागील 28 दिवसांपासून भारताचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्केंपेक्षा कमी आहे.

loading image