esakal | कोरोनाचा विळखा सैल होतोय, नवीन रुग्णसंख्या 30 हजारांवर
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा विळखा सैल होतोय, नवीन रुग्णसंख्या 30 हजारांवर

कोरोनाचा विळखा सैल होतोय, नवीन रुग्णसंख्या 30 हजारांवर

sakal_logo
By
नामदेव कुंभार

coronavirus in india, covid-19, latest updates: दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्यामध्ये सोमवारी दिलासा मिळाला आहे. मागील दोन ते तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच देशातील नवीन कोरोना रुग्णवाढ 30 हजारांवर पोहचली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णवाढ सर्वोच्च स्थानी पोहचली होती. तेव्हा देशात दररोज तीन ते चार लाख नवे रुग्ण आढळत होते. पण गेल्या काही दिवसांतील कोरोना आकडेवारीनुसार, दुसरी लाट ओसरली असल्याची चिन्हे आहेत. मात्र कोरोनाचा धोका कायम आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशात 30 हजार 93 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 45 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मृताची संख्यामध्येही मोठी घट पाहायला मिळाली आहे.

देशातील कोरोना स्थिती -

एकूण रुग्णसंख्या Total cases: 3,11,74,322

उपचाराधीन रुग्ण Active cases: 4,06,130

कोरोनामुक्त Total recoveries: 3,03,53,710

एकूण मृत्यू Death toll: 4,14,482

एकूण लसीकरण Total vaccination: 41,18,46,401

हेही वाचा: First Time Voter : मतदान ओळखपत्र हवेय; पण ते कसं काढायचं?

राज्यातील स्थिती काय?

राज्यात सोमवारी दिवसभरात 6,017 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 62,20,207 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,03,486 वरून 96,375 पर्यंत खाली ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सोमवारी 66 रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1,27,097 वर पोहोचला आहे. मृत्यूचा दर 2.04 टक्के इतका झाला आहे.

loading image