Coronavirus : संघाचे स्वयंसेवक लागेल ती मदत करतील : सरसंघचालक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देशासाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचे संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. आज (ता. २५) प्रतिपदेच्या भाषणादरम्यान ते बोलत होते.

पुणे : देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देशासाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचे संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. आज (ता. २५) प्रतिपदेच्या भाषणादरम्यान ते बोलत होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भागवत म्हणाले, 'शासन आणि प्रशासनाच्या प्रत्येक आवश्यक त्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तयार आहेत. देशातील नागरिकांच्या मदतीसाठी सर्व आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीनं स्वयंसेवकांनी सुरू केलं आहे. आपण सर्वांनी यावेळी नियमांचं कठोरपणे पालन करायला हवं असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भागवत पुढे म्हणाले, 'संपूर्ण समाजाकडून अनुशासनाचं पालन केलं गेले पाहिजे. औषधं आणि अन्य आवश्यक सेवा सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कोरोना विरोधात असणाऱ्या या युद्धातील महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल डिस्टंसिंग आहे आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याद्वारेच आपण कोरोनावर मात करू शकतो. हे युद्ध आपल्याला सर्वांना एकसोबत लढायचं आहे, हे लक्षात घ्यायला हवं, हे लक्षात घेतल्यास आपला विजय निश्चित आहे.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (ता. २४) रात्री देशात पुढचे २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. सध्या देशातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५५०च्या जवळ पोहोचली आहे. तर, ११ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Situation Need To Fight Together says Mohan Bhagwat