आता चेहऱ्याच्या क्रीमसाठीही लागणार प्रिस्क्रिप्शन

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

जाहिराती पाहून एखादी क्रीम यापूर्वी विकत घेता येत असे. मात्र, आता हीच फेअरनेस क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन लागणार आहे. यासाठी सरकारने फेअरनेस क्रीम्ससाठी नवे नियम लागू केले आहेत.

नवी दिल्ली : जाहिराती पाहून एखादी क्रीम यापूर्वी विकत घेता येत असे. मात्र, आता हीच फेअरनेस क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन लागणार आहे. यासाठी सरकारने फेअरनेस क्रीम्ससाठी नवे नियम लागू केले आहेत. आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय फेअरनेस क्रीम्स विकत घेता येणार नाहीत. या फेअरनेस क्रीममध्ये स्टेरॉईड आणि अँटीबायोटिक्सचा समावेश असल्याचे समोर आले आहे.  

Cosmetics cream

केंद्र सरकारने स्टेरॉईड असणाऱ्या क्रीम्सना 'ओव्हर द काऊंटर'च्या विक्री यादीतून काढून शेड्युल-एचमध्ये टाकले आहे. याअंतर्गत अशाप्रकारच्या फेअरनेस क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे अशा स्टेरॉइडमिश्रित क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकणाऱ्यांवर एफडीएकडून कारवाई केली जाणार आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्टेरॉईड आणि अँटीबायोटिकचा समावेश असलेल्या १४ क्रीम्सच्या विक्रीवर बंदी आणली आहे. या नियमांचे पालन केले नाही तर एफडीएच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. याबाबतची सूचना 23 मार्च रोजी देण्यात आली. 

Web Title: Cosmatics Cream need to Prescription from Doctor