
भोपाळ : बुरहानपूर जिल्ह्यातील नेपानगर येथील आदिवासी वसतिगृहात ९ वीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये आपल्या वडिलांना एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्याने 'लव्ह यू पापा' असं लिहीत अभ्यासाचं वाचल्याचं लक्षात राहत नसल्याचं सांगत स्वतःच्या मर्जीनं आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट आढळली आहे. लाईव्ह हिंदुस्थानने याबाबत वृत्त दिले आहे. शनिवारी सकाळी नेपानगरच्या वॉर्ड क्रमांक 14 मध्ये असलेल्या आदिवासी वसतिगृहात एका अल्पवयीन विद्यार्थ्याने फाशी घेतली होती. संबंधित विद्यार्थी धुळकोटमधील उटंबी येथील रहिवासी होता. (I couldnt fulfill my dream due to amnesia Students write suicide note and hang self)
स्मृतीभ्रंशामुळे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व
आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये, आपल्याला स्मृतिभ्रंशचा आजार झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तो जे काही अभ्यास करायचा तो ते विसरत होता. यामुळे आपण आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करू शकत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. हा विद्यार्थी नेपानगर येथील शाळेत ९ वीत शिकत होता. दरम्यान, घटनेवेळी वसतिगृह अधीक्षक किंवा अन्य शिक्षक वसतिगृहात उपस्थित नसल्याचा आरोप मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी केला आहे. ते घटनास्थळी हजर असते तर विद्यार्थ्याला वाचवता आले असते.
लव्ह यू पप्पा... मला तुमच्यासारखे पप्पा मिळाले
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याने वडिलांबाबत प्रेम व्यक्त करत लव्ह यू पापा असे लिहिले आहे. तुमच्यासारखे वडील मिळणे हे माझे भाग्यच होते. तुमचा मुलगा नेहमीच तुमची स्वप्नपूर्ती करणारा असावा. मात्र मी काही करू शकत नाही, तर जीवनाचा उपयोग काय? पप्पा मला माफ करा, मी तुमचे स्वप्न पूर्ण करू शकत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.