esakal | डिसेंबरअखेर देशात 110.22 लाख टन साखर उत्पादन ! मागील वर्षीपेक्षा 32.59 लाख टन उत्पादन अधिक 
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar

यंदा देशातील 481 साखर कारखान्यांत डिसेंबर 2020 अखेर 110.22 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी या कालावधीत 437 कारखान्यांत 77.23 लाख टन साखर उत्पादन झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात 32.59 लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांतील साखर हंगाम यावर्षी लवकर सुरू झाल्याने देशातील साखर उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. 

डिसेंबरअखेर देशात 110.22 लाख टन साखर उत्पादन ! मागील वर्षीपेक्षा 32.59 लाख टन उत्पादन अधिक 

sakal_logo
By
प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : यंदा देशातील 481 साखर कारखान्यांत डिसेंबर 2020 अखेर 110.22 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी या कालावधीत 437 कारखान्यांत 77.23 लाख टन साखर उत्पादन झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात 32.59 लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांतील साखर हंगाम यावर्षी लवकर सुरू झाल्याने देशातील साखर उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. 

महाराष्ट्रात यंदा 179 कारखान्यांत 39.86 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी या कालावधीत येथे 135 कारखान्यात 16.50 लाख टन साखर उत्पादन झाले होते. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 23.36 लाख टन जादा साखर उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात 120 कारखान्यांत 33.66 लाख टन साखर यावर्षी तयार झाली असून मागील हंगामात तेथे 119 कारखान्यात 33.16 लाख टन साखर उत्पादन झाले होते. 

चालू हंगामात कर्नाटकात 66 कारखान्यांत 24.16 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी तेथे 63 कारखान्यात 16.33 लाख टन साखर उत्पादन झाले होते. गुजरातमध्ये यंदा 15 कारखान्यात 3.35 लाख टन साखर तयार झाली आहे. गतवर्षी तेथे एवढ्याच कारखान्यात 2.65 लाख टन साखर तयार झाली होती. 

आंध्र प्रदेश व तेलंगणातील 12 कारखान्यांत 94 हजार टन साखर उत्पादन यावर्षी झाले आहे. गतवर्षीच्या हंगामात तेथे 18 कारखान्यांत 96 हजार टन साखर उत्पादन झाले होते. तमिळनाडूत यंदा 19 कारखान्यात 85 हजार टन साखर तयार झाली आहे. गतवर्षी तेथे या कालावधीत 95 हजार टन साखर उत्पादन झाले होते. बिहारमध्ये यंदा 1.88, हरियाणात 1.95, पंजाबमध्ये 1.20, उत्तराखंडमध्ये एक तर मध्यप्रदेश व छत्तीसगढमध्ये 1.30 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. 

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उपग्रहाद्वारे "इस्मा' ऊस क्षेत्राच्या प्रतिमा मिळविण्याची शक्‍यता आहे. कापणी न झालेल्या उसाच्या प्रतिमा, साखर उताऱ्याचा कल, उसापासून मिळणारे उत्पादन याआधारे "इस्मा' 2020-21 च्या हंगामातील साखर उत्पादनाचा गरज पडल्यास दुसरा अंदाज व्यक्त करण्याची शक्‍यता आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image