PM Narendra Modi | देश विखारी चक्रात अडकला होता पण...; काँग्रेसवर टीका करत मोदींचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi
गेल्या आठ वर्षात भारताने जी उंची गाठलीये, त्याची कल्पनाही कोणी केलं नसेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

देश विखारी चक्रात अडकला होता पण...; काँग्रेसवर टीका करत मोदींचं विधान

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. लहान मुलांसाठी पीएम केअर फंडांतर्गत योजनाचं लोकार्पण करण्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. २०१४ पूर्वी देश घोटाळे आणि घराणेशाहीच्या गर्तेत अडकला होता, अशी टीकाही त्यांनी केलं. (PM Narendra Modi on Congress)

हेही वाचा: प्रसिद्धी, व्यवस्थापनातून मतांचं भरघोस पीक, मोदी सरकारची आठ वर्ष

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आज जेव्हा आमचं सरकार आठ वर्षे पूर्ण करत आहे, या देशाचा आत्मविश्वास, देशवासियांचा आत्मविश्वास अभूतपूर्व आहे. २०१४ पूर्वी हजारोंचे घोटाळे, भ्रष्टाचार, घराणेशाही, देशभरात पसरलेल्या दहशतवादी संघटना, प्रादेशिक भेदभाव या सगळ्यामुळे देश एका विखारी चक्रात अडकला होता".

हेही वाचा: शेतकऱ्यांना महागाईची झळ बसू दिली नाही - नरेंद्र मोदी

मोदी पुढे म्हणाले, "गेल्या आठ वर्षांमध्ये देशाने जी उंची गाठलीये, त्याची कल्पना यापूर्वी कोणी केली नसेल. आज भारताची मान जगभरात उंचावलेली आहे. आपल्या भारताची शक्ती जागतिक व्यासपीठांवर वाढलेली आहे. आणि मला आनंद आहे की हा भारताचा प्रवास युवकांच्या नेतृत्वाखाली होत आहे".

Web Title: Country Trapped In Scams And Nepotism Before 2014 Says Pm Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top