न्यायालयाने रामदेव बाबांचा मूळ व्हिडिओ मागवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdev Baba

न्यायालयाने रामदेव बाबांचा मूळ व्हिडिओ मागवला

नवी दिल्ली - योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी ॲलोपॅथीला मुर्खांचे शास्र म्हटले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांच्या वक्तव्याच्या व्हिडिओचा (Video) मूळ भाग मागविला आहे. या याचिकेवर पुढील सोमवारी सुनावणी होणार आहे. (Court Called for the Original Video of Ramdev Baba)

रामदेव बाबा यांच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रामदेव यांच्या मनात डॉक्टरांविषयी पूर्ण आदर आहे. त्यांच्या वक्तव्याचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचा मूळ व्हिडिओ आम्ही न्यायालयात सादर करू, असे त्यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने तो व्हिडिओ सादर करण्याचे आदेश दिले.

रामदेव बाबा यांनी ॲलोपॅथीवर टीका केल्यानंतर देशभरातून टीकेची झोड उठली. अनेक ठिकाणी निदर्शने, तर अनेक राज्यांत त्यांच्या विरोधात फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व फिर्यादी एकत्र करून त्यांची दिल्लीत सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर पाच जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Supreme Court