मोठी बातमी : गुजरात दंगलीप्रकरणी खटल्यातून न्यायालयाने मोदींचे वगळले नाव

टीम ई सकाळ
Sunday, 6 September 2020

गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील न्यायालयाने २००२मध्ये झालेल्या दंगलप्रकरणी पिडीतांच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाईसाठी दाखल केलेल्या खटल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव काढून टाकले आहे. ब्रिटीश परिवाराने दंगलीत मारल्या गेलेल्या आपल्या तीन नातेवाईकांसाठी हा खटला दाखल केला होता.

अहमदाबाद : गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील न्यायालयाने २००२मध्ये झालेल्या दंगलप्रकरणी पिडीतांच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाईसाठी दाखल केलेल्या खटल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव काढून टाकले आहे. ब्रिटीश परिवाराने दंगलीत मारल्या गेलेल्या आपल्या तीन नातेवाईकांसाठी हा खटला दाखल केला होता.

नरेंद्र मोदींचे नाव यामध्ये समाविष्ट करण्यास कोणताच तर्क आणि योग्य असे कारण नसल्याचा निर्वाळा देत वरिष्ठ न्यायाधीश एस. के. गढवी यांनी मोदींचे नाव काढून टाकण्याचा निर्णय दिला आहे. फिर्यादींनी आरोपी १ (मोदी) वर विनाकारण आरोप लावले आहेत. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार फिर्यादी विनाकारण खटला चावविण्यासाठी प्रयत्न करत होते. दंगलीच्यावेळी मोदी घटनास्थळी उपस्थित होते याचा कोणताही ठोस पुरावा हाती नाही. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर आरोप लावता येणार नाहीत. नुकसान भरपाईसाठी हा दिवाणी खटला शिरीन दाऊद, शमीमा दाऊद (दोन्ही ब्रिटीश नागरिक) आणि इम्रान सलीम दाऊद या नातेवाईकांद्वारे दाखल केला गेला होता.

ब्रिटिश नागरिक इम्रान आणि शिरीन दाऊद यांनी २००४मध्ये नरेंद्र मोदी यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. सईद दाउद, शकील दाउद आणि मोहम्मद असवत यांच्या मृत्यूप्रकरणी यांनी खटला दाखल केला होता. जयपूरवरुन नवसरीला परतताना २८ फेब्रुवारीला या तिघांवर हल्ला होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: court drops pm modi name three riots suits