esakal | दिलासादायक! भारतात कोरोनावरील पहिली लस विकसित; मानवी चाचणीस सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

कोव्हॅक्सिन ही करोना विषाणूवरील पहिली स्वदेशी लस हैदराबादमधील भारत बायोटेक या औषध कंपनीने ‘आयसीएमआर’ आणि राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थे (एनआयव्ही) च्या सहभाने विकसित केली आहे.

दिलासादायक! भारतात कोरोनावरील पहिली लस विकसित; मानवी चाचणीस सुरुवात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनावरील पहिल्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या मानवी चाचणीस अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) सुरुवात झाली आहे. भारतात विकसित केलेल्या या लशीचा पहिला डोस ३० वर्षांच्या स्वयंसेवकाला शुक्रवारी दिला.

या चाचणीसाठी गेल्या शनिवारपासून साडेतीन हजार स्वयंसेवकांनी ‘एम्स’मध्ये नावे नोंदविली आहेत. यापैकी २२ जणांची तपासणी करण्यात आल्याचे ‘एम्स’मधील सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसिन विभागातील प्राध्यापक आणि अभ्यासाचे प्रमुख निरीक्षक संजय राय यांनी दिली. पहिला स्वयंसेवक हा दिल्लीचा रहिवासी असून दोन दिवसांपूर्वी त्याची तपासणी झाली होती. त्याची आरोग्य स्थिती सामान्य होती आणि त्याला कोणतेही आजार नसल्याचे दिसल्याने संबंधित स्वयंसेवकाला लशीचा ०.५ मिलीलिटर एवढा डोस आज दुपारी दीड वाजता देण्यात आला. त्यावर आत्तापर्यंत कोणतेही दुष्परिणाम आढळले नाही. त्‍याला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवले जाणार असल्याचे डॉ. राय यांनी सांगितले. अन्य स्वयंसेवकांच्या तपासणीचे अहवाल आल्यानंतर त्यांना शनिवारी लस देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोव्हॅक्सिन ही करोना विषाणूवरील पहिली स्वदेशी लस हैदराबादमधील भारत बायोटेक या औषध कंपनीने ‘आयसीएमआर’ आणि राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थे (एनआयव्ही) च्या सहभाने विकसित केली आहे. केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून (डीसीजीआय) मानवी चाचणीसाठी त्यांना परवानगी मिळाली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मानवी चाचण्या
कोरोनावरील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला १२ संस्थांना भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंजुरी दिली असून त्यातील पहिली मानवी चाचणी आज ‘एम्स’मध्ये झाली.

पहिला टप्पा
३७५ - एकूण स्वयंसेवक

दुसरा टप्‍पा
७५० - एकूण स्वयंसेवक
१२ - संस्थांचा सहभाग