लस घेतल्यानंतर मास्क घालावा का? केंद्रानं दिलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लस घेतल्यानंतर मास्क घालावा का? PIB नं दिलं उत्तर

लस घेतल्यानंतर मास्क घालावा का? PIB नं दिलं उत्तर

कोरोना महामारीची दुसरी लाट हळू-हळू ओसरत आहे. पण चिंता मात्र कायम आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्शन, मास्क आणि लस या त्रिसुत्रीची अंबलबजावनी करण्यात आली आहे. मात्र, लस आणि मास्क संदर्भात अनेक मेसेज सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. पीआयबीच्या (PIB) फॅक्ट चेक टीमनं या व्हायरल मेसेजची पडताळणी केली आहे. पाहूयात व्हायरल झालेल्या मेसेजसंदर्भात...

एक किंवा त्यापेक्षा जास्त रोग असणाऱ्यांनी कोरोनाप्रतिबंधक लस घेऊ नये....?

एक किंवा अधिक रोग असणाऱ्यांना कोरोना संक्रमणाची भिती सर्वाधिक असते. कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित आणि प्रभावी आहे, अशा लोकांनी सर्वात आधी लसीकरण करावं.

लसीकरणानंतर मास्क घालायची गरज नाही

लसीकरणानंतरही मास्क घालणं गरजेचं आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना नियमांचं पालन आवश्य करा. जसं मास्क घालणं, हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे.

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर लसीची गरज नाही?

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींनाही लस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोना नियमांचं पालन करत कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यानंतर लस घ्यावी.

कोरोना लस घेतल्यानंतर महिला आणि पुरुषांमध्ये नपुसकता येते?

कोरोना लस पुर्णपणे सुरक्षित आहे. कोरोना लसीमुळे महिला अथावा पुरुषांमध्य नपुसकता येते, असं कोणतेही वैज्ञानिक कारण नाही.

मासिकपाळीच्या आधी पाच दिवस अथवा आधी पाच दिवस लस घेऊ नये.

तज्ज्ञांनी हा दावा चुकीचा असल्याचं सांगितलं आहे. मासिक पाळीच्या आधी अथवा नंतर लस घेतल्यानंतर कोणाताही दुष्परिणाम होत नाही.

आपल्या चिमुकल्यांना स्तनपान करणाऱ्या मातांनी लस घेऊ नये?

अशा अफवांवर लक्ष देऊ नये. ही चुकीची अफवा आहे. अशा महिलांनीही कोरोनाचा डोस नक्की घ्यावा.

सोशल मीडियावर (Social Media) दररोज कोरोना महामारी (COVID-19) रोखण्यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. काही लोकं यावर डोळं झाकून विश्वास ठेवतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक बाब खरीच असेल असं नाही. त्यामुळे कोणत्याही बाबीवर विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य पडताळून पाहावं. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. यामध्ये अनेक अफवा या कोरोनावरील उपचारांशी निगडीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही माहितीची शहानिशा व सत्यता पडताळल्याशिवाय उपाय करु नका, असं वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :covid-19