Covid-19: 'तो' पुन्हा येतोय ? कोरोनाच्या नव्या प्रकाराने वाढवली डोकेदुखी; या देशात पुन्हा मास्क घालण्याचे आवाहन

Covid-19: जगाची डोकेदुखी वाढवणाऱ्या कोरोना महामारीतून जग आता कुठे सावरत असताना आता कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे.
COVID-19 Surge Worldwide New Variant FLiRT Govt Urges Citizens To Wear Mask In Singapore
COVID-19 Surge Worldwide New Variant FLiRT Govt Urges Citizens To Wear Mask In Singapore Esakal

जगाची डोकेदुखी वाढवणाऱ्या कोरोना महामारीतून जग आता कुठे सावरत असताना आता कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. या महामारीमुळे जगभरात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अलिकडच्या काळात या आजाराची प्रकरणे कमी झाली असली तरी आताही त्याचे अनेक प्रकार सतत चिंतेचा विषय बनत आहेत. अलीकडे, आणखी एका प्रकारामुळे आरोग्य तज्ञांची चिंता वाढली आहे.

FLiRT, कोविडचा नवीन प्रकार ज्याने अमेरिकेत आणि सिंगापूरमध्ये कहर केला आहे, आता या कोरोनाच्या प्रकारानेही भारतातही पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनाची प्रकरणे स्थिर होती, मात्र आता पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अलीकडील अहवालानुसार, कोरोनाच्या नवीन प्रकारांचा एक नवीन संच सांडपाण्यात अलीकडेच दिसला आहे, ज्याला FLiRT असे नाव देण्यात आले आहे.

COVID-19 Surge Worldwide New Variant FLiRT Govt Urges Citizens To Wear Mask In Singapore
Covid New Variant : अरे बापरे! कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट आला समोर.. काय आहेत 'FLiRT'ची लक्षणं? भारताला किती धोका?

युनायटेड स्टेट्स आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये या नवीन प्रकाराची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. वाढणाऱ्या संसर्गामुळे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा सर्व लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

CDC नुसार, KP.2 उप-प्रकारामुळे यूएस मध्ये 14 ते 27 एप्रिल दरम्यान सुमारे 25% प्रकरणे झाली. जागतिक स्तरावर, कोरोनाचे JN.1 आणि त्याचे उप-प्रकार, ज्यात KP.1 आणि KP.2 यांचा समावेश आहे, वाढताना दिसत आहे. सिंगापूरमध्ये सध्या KP.1 आणि KP.2 पेक्षा जास्त प्रकरणे आहेत.

संशोधकांनी सांगितले की, कोरोनाचे हे रूप ओमिक्रॉनसारखे आहे, जे लोकांना वेगाने संक्रमित करू शकते. याशिवाय, हा प्रकार लसीकरणामुळे निर्माण होणारी शरीराची प्रतिकारशक्ती कमी करण्यातही यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.

COVID-19 Surge Worldwide New Variant FLiRT Govt Urges Citizens To Wear Mask In Singapore
Social Media Trolling: आईच्या कुशीतून निसटल्याने बाळ बाल्कनीत पडलं, लोकांनी ट्रोल केल्यानं आईनं जीवन संपवलं

नवीन प्रकार FLiRT बाबत सूचना

CDC डेटानुसार, FLiRT प्रकाराचे दोन प्रकार (KP.1.1 आणि KP.2) सध्या वेगाने वाढत आहेत. दोन आठवड्यांच्या कालावधीत, या प्रकारामुळे संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ नोंदवली जात आहे.

अमेरिकेतील येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या डीन मेगन एल. रेनी यांनी एका अहवालात सांगितले की, FLiRTमध्ये काही चिंताजनक वैशिष्ट्ये आढळून आली आहेत. त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये असे बदल आहेत ज्यामुळे ते सहजपणे मानवी शरीरात प्रवेश करू शकते आणि संसर्ग होऊ शकते.

COVID-19 Surge Worldwide New Variant FLiRT Govt Urges Citizens To Wear Mask In Singapore
उमेदवाराला विरोध म्हणून विद्यमान खासदाराने मतदान सुद्धा केले नाही! भाजपने पाठवली कारणे दाखवा नोटीस

वाढत्या संसर्गामध्ये पुन्हा मास्क घालण्याचा सल्ला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंगापूरमध्ये कोविड-19 ची नवीन लाट दिसत आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, 5 ते 11 मे पर्यंत येथे 25,900 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी शनिवारी पुन्हा एकदा देशातील जनतेला मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

सिंगापूरचे आरोग्यमंत्री कुंग यांनी सांगितले की, कोरोनाच्या या नवीन लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत, संसर्गाची प्रकरणे सतत वाढत आहेत. येत्या दोन ते चार आठवड्यांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता, सर्व लोकांनी पुन्हा एकदा मास्क घालण्याची सवय लावली पाहिजे जेणेकरून संसर्गाचा प्रसार नियंत्रित करता येईल. प्रत्येकाने जून अखेरपर्यंत संसर्गाच्या या नवीन लाटेबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

COVID-19 Surge Worldwide New Variant FLiRT Govt Urges Citizens To Wear Mask In Singapore
Jaish e Mohammed: जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट, निकाल देताना दिला रशियन लेखकाचा दाखला

भारतातही नवीन प्रकाराची प्रकरणे नोंदवली गेली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोनाचे नवीन प्रकार, FLiRT भारतातही आढळून आला आहे. भारतात आतापर्यंत 250 प्रकरणे नोंदवली आहेत.

Omicron sub-variant KP.2 ची महाराष्ट्रात 91 प्रकरणे आढळून आली आहेत, जे राज्यातील कोरोना प्रकरणांमध्ये वाढ दर्शवितात. 15 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, या नवीन प्रकाराची लागण झालेल्यांमध्ये पुण्यात सर्वाधिक 51 लोक आढळले असून, 20 प्रकरणांसह ठाणे दुसऱ्या स्थानावर आहे. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येकी सात प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com