कोरोनाची तिसरी लाट आदळणारच, केंद्र सरकारची माहिती

कोरोना विषाणूचे प्रतिकात्मक छायाचित्र
कोरोना विषाणूचे प्रतिकात्मक छायाचित्रप्रतिकात्मक छायाचित्र

कोरोना संसर्गाची तिसरी लाट (COVID-19 Third Wave) भारतावर आदळणार आहे, मात्र ती कधी आढळणार आणि तिची तीव्रता किती असणार हे माहित नाही, याबाबत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. सध्याच्या लाटेची तीव्रता पुढच्या महिनाभरात ओसरू लागेल, असा अंदाजही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (COVID-19 Third Wave inevitable, not clear on what time scale it will occur)

संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतच धापा टाकणाऱ्या भारताच्या आरोग्य यंत्रणेसाठी आणि देशवासियांसाठी हा तिसऱ्या लाटेचा इशारा केंद्र सरकारचे (Central government) मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी दिला आहे. ‘ही संभाव्य तिसरी लाट कधी येईल आणि तीव्रता किती असेल, हे आज सांगू शकत नाही. मात्र आम्हाला तयारी ठेवावीच लागेल,’ असे राघवन यांनी आज स्पष्टपणे नमूद केले. दरम्यान, महाराष्ट्रासह (maharashtra) देशातील पाच राज्यांमध्ये अजूनही सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. देशात आजही दररोज २.४% या प्रमाणात नवे रुग्ण वाढ वाढत आहेत आणि हे प्रमाण कमी झाल्याशिवाय कोरोना लाटेचा सामना करण्यास करण्याची परिस्थिती नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या लाटा

- पहिली लाट( COVID-19 Wave ) : मागच्या वर्षी मार्च - एप्रिल महिन्यात. १७ सप्टेंबर २०२० ला ९७ हजार ८६० इतके सर्वाधिक रुग्ण देशात आणले होते.दोन महिन्यांनी ही लाट ओसरून ४६ हजारांवर दैनंदिन रुग्णसंख्या आली होती.

- दुसरी लाट( COVID-19 Wave ) : मार्च महिन्याच्या सुरुवातीला. एक मार्चला देशात १२,२७० नवे रुग्ण आढळले होते. १ एप्रिलला ही संख्या ७५ हजारांवर गेली. महिना संपता संपता ३० एप्रिलला दैनंदिन रुग्ण संख्या ४.०२ लाखांवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com