काळजी घ्या; कोरोनाची दुसरी लाट अजून कायम; केंद्राची माहिती

कोरोना
कोरोना

नवी दिल्ली : कोरोनाबाधित गर्भवतींपैकी ९० टक्केपेक्षा जास्त महिला घरातच बऱ्या होतात व त्यांना रुग्णालयांत दाखल करावे लागत नाही. त्यांनी लसीकरणही करून घ्यावे, असे निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वर्तविले आहे. दरम्यान, संसर्गाची दुसरी लाट अजून संपलेली नाही. त्यामुळे कोणीही रिलॅक्स मूडमध्ये राहू नये, असा इशारा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज दिला.

देशातील रूग्णसंख्या ५० हजारांच्या खाली आल्याने अनेक राज्यांनी अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याबरोबर बाजारपेठांमध्ये गर्दी उसळताना पहायला मिळत आहे. मास्क लावण्याचे, सामाजिक अंतरभान पाळण्याचे प्रमाणही दररोज अधिकाधिक घटल्याचे दिसून येत आहे. या सर्वांबाबत तज्ज्ञ वारंवार सारे देत आहेत. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की जोपर्यंत देशात दररोज नवे रूग्ण आढळण्याचे प्रमाण कायम राहील, तोपर्यंत संसर्गाची दुसरी लाट संपली, असे मानणे मोठी चूक ठरेल. नागरिकांनी सावध राहून आरोग्य नियमांचे पालन कटाक्षाने केले पाहिजे. बेपर्वाई झाली तर त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल. लसीकरण हाच यावरचा सर्वांत प्रभावी उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने लसीचे दोन्ही डोस आपल्याला निर्धारित तारखेला घ्यावेत, असेही ते म्हणाले. मात्र तिसऱ्या लाटेबाबतचे भाकीत करण्यास त्यांनी नकार दिला. नवीन लाट येणार का ? आलीच तर कधी येणार ? हे सर्वाधिक नागरिकांवरच अवलंबून आहे, असे ते म्हणाले.

कोरोना
एसबीआयचा खातेदारांना झटका, आता चार वेळेसच नि:शुल्क पैसे काढा

कोवीडमुळे देशातील गर्भवतीबाबत आरोग्य दिशानिर्देश आरोग्य मंत्रालयाने आज जारी केले. मंत्रालयाने हे दिशानिर्देश प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जारी केले आहेत. त्यामुळे आरोग्यदूतांना गर्भवतींमध्ये कोरोना लसीकरणाबाबतची जागृती करणे सोपे होणार आहे. लस गर्भवतींनी घेऊ नये, या चर्चेचे खंडन या दिशानिर्देशात करण्यात आले आहे. मात्र ज्या महिलांना कोरोनाची लागण होते त्यांच्या गर्भालाही त्याच्या संक्रमणाचा धोका असतो, असे यात म्हटले आहे. ज्या महिलांना संक्रमणाची तीव्र लक्षणे दिसत नसतील त्यांनी अवश्य लसीकरण करून घ्यावे. गर्भावस्थेत कोरोनाचा धोका वाढत नाही. मात्र ३५ वर्षांपुढील व स्थूल महिलांमध्ये गर्भावस्थेत कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. इतर महिलांना तो तेवढा असत नाही. डॉक्टर व आरोग्य सेवकांनी गर्भवतींना लसींची उपलब्धता, महत्त्व व सावधगिरीबाबत सल्ला द्यावा व तशी जनजागृतीही करावी. कोरोना लस १०० टक्के सुरक्षित आहे व गर्भवतीसाठीही ती इतर नागरिकांइतकीच संरक्षक ठरल्याचे दिसून आले आहे, असेही या दिशानिर्देशांत म्हटले आहे.

कोरोना
धोका वाढतोय! राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे आणखी 14 रुग्ण

पाच लाखांत एकालाच कोरानाचा धोका

आरोग्यमंत्रालयाच्या नव्या दिशानिर्देशांनुसार कमी प्रमाणात ज्या गर्भवती बाधित आढळतात त्यांच्या बाळांची प्रकृती जन्मावेळी अतिशय चांगली असते. संक्रमित मातांच्या अडीच किलोग्रॅम वजनापेक्षा कमी वजनाच्या अर्भकांना मात्र मृत्यूचा धोका संभवतो. लसीकरण केल्यावर ५ लाखांपैकी एखाद्या गर्भवतीलाच २० दिवसांनी कोरोना संक्रमणाचा धोका असतो. इतर महिलांना हलका ताप येणे, इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी २-३ दिवस दुखणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्या काळजी करण्यासारख्या नाहीत. अशा महिलांनी लसीकरणानंतर कोरोनाची काही गंभीर लक्षणे आढळली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com