esakal | कोविड पॉझिटिव्ह अमित शहांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती अडवाणींची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah and adwani.jpg

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. शहा यांनी 22 जूलै रोजी भाजपचे वयोवृद्ध नेता लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती

कोविड पॉझिटिव्ह अमित शहांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती अडवाणींची भेट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. शहा यांनी 22 जूलै रोजी भाजपचे वयोवृद्ध नेता लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती. यावेळी शाह यांच्यासोबत भाजपचे महासचिव भूपेंद्र यादवही होते. अमित शहा यांनी शनिवारी आईसीसीआरच्या वेबीनारमध्ये भाग घेतला होता. लोकमान्य टिळकांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आयोजित वेबिनारमध्ये विनय सहस्त्रबुद्धेही उपस्थित होते. याआधी बुधवारी कॅबिनेट बैठक झाली होती. मात्र, शहा यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती का, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.  राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अमित शहा यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ते भूमिपूजनाला जाणार नसल्याचं सूत्रांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. 

कोरोनाची लस पहिल्यांदा कोणाला देणार?

देशात कोरोनाचे संकट असताना गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. अमित शहा यांनी ट्विट करुन स्वत: याची माहिती दिली आहे. कोरोनाचे प्राथमिक लक्षणे दिसत असल्याने मी तपासणी केली, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठिक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत आहे. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे आणि स्वत:ची तपासणी करावी, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. शहा यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अमित शहा यांना कोरोना झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. 

कोरोनामुळे एसटी सेवेला ‘ब्रेक’ लागला आणि कर्मचाऱ्यांवर आली हि वेळ

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अमितजी, सर्व संकटांसमोर तुम्ही दृढता आणि प्रबळ इच्छाशक्तीने उभे ठाकला आहात. कोरोनावरील या संकटावरही तुम्ही नक्की मात कराल असा मला विश्वास आहे. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही ट्विट करत अमित शहा यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. माननीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी मिळाली. मी देवाजवळ त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असं ते म्हणाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनीही ट्विट करुन अमित शहा लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

(edited by-kartik pujari)