लसीचे दोन्ही डोस घेतले, देशांतर्गत विमान प्रवासासाठी कोरोना टेस्टपासून दिलासा?

लसीचे दोन्ही डोस घेतले, देशांतर्गत विमान प्रवासासाठी कोरोना टेस्टपासून दिलासा?

गेल्या वर्षभरापासून कोरोनानं (Corona Update) जगात अक्षरशः थैमान घातलं आहे. संसर्गजन्य रोग असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. तसंच विमान प्रवासावरही (Travel banned) काही निर्बंध लावण्यात आले आहेत. सद्य परिस्थितीत देशाअंतर्गत विमान प्रवासाला (Domestic flight status) परवानगी देण्यात आली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय विमान प्रवास (international flights Schedule) अजूनही बंद आहे. देशांतर्गत विमान प्रवासासाठी प्रवाशांना आयडी कार्ड तसंच आरोग्य सेतू (Aarogya Setu App) अप्लिकेशनचं स्टेटस दाखवणं अनिवार्य आहे. तसंच कोरोना चाचणी निगेटिव्ह असणंही अनिवार्य आहे. मात्र आता कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना आता कोरोना चाचणी (RT-PCR test) नसणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. (Covid test will not be compulsory for vaccinated travelers soon on domestic flights)

लसीचे दोन्ही डोस घेतले, देशांतर्गत विमान प्रवासासाठी कोरोना टेस्टपासून दिलासा?
१ जूनपासून Google Photos मध्ये होणार मोठा बदल

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासूनच विमान प्रवासादरम्यान अनेक निर्बंध लावण्यात आले होते. यात प्रवाशांना उड्डाणाच्या ७२ तासांदरम्यान केलेल्या कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं अनिवार्य आहे. मात्र आता कोरोनाचं लसीकरण संपूर्ण देशात सुरु झालंय. त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांना या कोरोना चाचणीपासून सूट मिळण्याची शक्यता आहे.

भारतात पंजाब हे राज्य वगळता सर्वच राज्यांमध्ये विमान प्रवासादरम्यान RT-PCR चाचणीचं निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणं अनिवार्य आहे. पंजाबमध्ये ज्या प्रवाशांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत अशा प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची नाही. मात्र आता पंजाबच्या धर्तीवर इतर राज्यांमध्येही असा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतले, देशांतर्गत विमान प्रवासासाठी कोरोना टेस्टपासून दिलासा?
धावत्या रेल्वेत घडला हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग; प्रवाशांचेही पाणावले डोळे

याबद्दलचा संपूर्ण निर्णय नागरी उड्डाण मंत्रालय घेऊ शकणार आहे. तसंच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाची परवानगीही महत्वाची असणार आहे. त्यामुळेच हा निर्णय नक्की कधी होणार याबद्दल अजून कुठलीच स्पष्ट नाहीये.

(Covid test will not be compulsory for vaccinated travelers soon on domestic flights)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com