esakal | लहान मुलांवरील कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी लवकरच पूर्ण होईल, केंद्राची हायकोर्टात माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

child vaccination.

लहान मुलांवरील कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी लवकरच पूर्ण होईल, केंद्राची हायकोर्टात माहिती

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: १८ वर्षाखालच्या वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीच्या (covid preventive vaccine) चाचण्या सुरु आहेत आणि त्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच लहान मुलांच्या (childrens) लसीकरणासंदर्भात धोरण बनवण्यात येईल. तज्ज्ञांच्या समितीकडून (expert committe) परवानगी मिळाल्यानंतर जलदगतीने त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं केंद्र सरकारने (central govt) शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितलं. (Covid vaccine trial on children near completion Centre to HC dmp82)

राजधानी दिल्लीत कोरोना लसीकरण मोहिमेत १२ ते १८ वयोगटातील मुले आणि त्यांच्या पालकांना प्राधान्य देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. एका १२ वर्षाच्या मुलीने तिच्या आईच्या मदतीने ही याचिका दाखल केली आहे.

हेही वाचा: लॉकडाऊन जीवावर बेतला; विरारच्या हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

संपूर्ण जग लहान मुलांच्या लसीकरणाची प्रतिक्षा करत आहे, असं मुख्य न्यायाधीश डी.एन.पटेल आणि न्यायाधीश ज्योती सिंग यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सांगितलं. कोर्टाने केंद्राला अधिकची वेळ वाढवून दिली तसचं सहा सप्टेंबरला यावर आता पुढील सुनावणी होईल. झायडस कॅडिला DNA आधारीत लस बनवत आहे. त्यांनी १२ ते १८ वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी केलीय, असं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी आधी कोर्टाला सांगितलं होतं.

loading image