हाहाकार! 24 तासांत सर्वाधिक मृत्यू, तिसऱ्या दिवशी 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण

हाहाकार! 24 तासांत सर्वाधिक मृत्यू, तिसऱ्या दिवशी 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण

कोरोना महामारीच्या (COVID19) दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला आहे. दररोज आढळणारी रुग्णसंख्या नवनवीन विक्रम करत आहेच. आरोग्य व्यवस्थेच्या तुडवड्यामुळे मृतांच्या संख्येतही विक्रमी वाढ होताना दिसतेय. 7 मे 2021 रोजी मृताच्या संख्येनं सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry )आज दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येनं आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. शुक्रवारी 4 हजार 187 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू (Death toll) झाला आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. (covid19 cases in india today all updates india records its highest one day covid deaths)

आरोग्य व्यवस्थेंचा उडालेल्या बोजवाऱ्यामुळे देशात मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. दुसरी लाट अतिशय भयावह परिणाम करत आहे. रुग्णालयात बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि गोळ्या-औषधांचा तुडवडा पडला आहे. अनेक रुग्ण उपचाराविना मरतायेत. स्मशनात अंत्यसंस्कार करण्यासाठीही जागा नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवलाय. शनिवारी आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry ) दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत चार लाख 1 हजार 78 नवीन रुग्ण आढळले आहेत. लागोपाठ तिसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

हाहाकार! 24 तासांत सर्वाधिक मृत्यू, तिसऱ्या दिवशी 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण
ये शहर है कोरो'ना' का... इवली-इवलीशी मुले होताहेत बाधित; तीन दिवसांत २5 रुग्णांची भर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry ) दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Total cases) दोन कोटी 18 लाख 92 हजार 676 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एक कोटी 79 लाख 30 हजार 960 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात (Total discharges) केली आहे. मृताच्या संख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत देशात दोन लाख 38 हजार 270 रुग्णांचा मृत्यू (Death toll) झाला आहे. देशात सध्या 37,23,446 रुग्ण उपचाराधीन (Active cases) आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com