COVID-19 : देशात पुन्हा कोरोनाचा कहर; 24 तासांत आढळले 3,038 नवे रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) कहर पहायला मिळतोय.
Corona
Coronaesakal
Summary

गेल्या काही दिवसांपासून भारतात कोविडच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) कहर पहायला मिळतोय. गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 (COVID-19) चे 3,038 नवीन रुग्ण आढळले आहेत.

सध्या देशात कोविडचे 21,000 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कोविडमुळं 7 मृत्यूची नोंद झाली आहे. पंजाबमध्ये कोरोनामुळं 2, उत्तराखंडमध्ये 1, महाराष्ट्रात 1 (Maharashtra), जम्मूमध्ये 1 आणि दिल्लीत 2 मृत्यूची नोंद झाली आहे.

आज (मंगळवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) आकडेवारीनुसार, कोविड प्रकरणांची एकूण संख्या 4.47 कोटी (4,47,29,284) वर पोहोचली आहे. सध्या सक्रिय प्रकरणं एकूण संक्रमणांपैकी 0.05 टक्के आहेत. कोरोना आजारातून बरं झालेल्या रुग्णांची संख्या 44177204 आहे. तर, कोविड रुग्णांचा मृत्यू दर 1.19 नोंदवला गेला आहे.

Corona
Politics : काँग्रेसचा 'हा' बडा नेता करणार 'स्मशानभूमी'तून निवडणूक प्रचाराला सुरुवात; कोण आहेत जारकीहोळी?

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात कोविडच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं लोकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी व्यक्त केलं.

Corona
China vs India : चीनच्या कुरापती वाढल्या; अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com