esakal | कोविन ॲप जगाला देण्यास तयार; नरेंद्र मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

कोविन ॲप जगाला देण्यास तयार; नरेंद्र मोदी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनासारख्या (Corona) शतकातून एकदाच येणाऱ्या जागतिक साथीविरुद्ध लढण्यासाठी सर्व देशांना परस्परांपासून शिकावे लागेल व मदतही (Help) करावी लागेल असे सांगतानाच, कोरोनावरील कोविन मोबाईल अॅपचे तंत्रज्ञान (Covin Mobile App Technology) जगाला देण्यास भारत (India) तयार आहे, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज दिला. (Covin Ready to Give App World Narendra Modi)

भारतातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोविन जागतिक परिषदेत ते बोलत होते. कोविनच्या माध्यमातून कोरोनाशी लढण्यासाठी जागतिक लसीकरण मोहिमेतील अनुभवांची विविध देशांनी परस्परांशी देवाणघेवाण करावी या दृष्टीने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा: काँग्रेसला मोठा दणका; प्रणव मुखर्जींचे पुत्र 'तृणमूल'मध्ये

भारत जागतिक साथीच्या सुरवातीपासूनच आपले तंत्रज्ञान जगाला देण्यास तयार आहे, असे सांगून मोदी म्हणाले की सॉफ्टवेअर हे असे क्षेत्र आहे जेथे तंत्रज्ञान व साधनांची कमतरता नाही. भारताने ट्रेसिंग-ट्रॅकिंगपासून कोविन चा वापर सुरू केला. २० लाख लोकांसह हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. जगात कितीही सामर्थ्यवान, शक्तीशाली देश असला तरी कोरोनासारख्या जागतिक साथीविरुद्ध तो एकट्याने लढू शकत नाही असा अनुभव आहे. आम्हाला मानवता दाखवून परस्परांना मदतीचा हात द्यावाच लागेल.

किमान ५० देश उत्सुक

कोविन अॅपची सोर्स आवृत्ती बनवावी व जे देश कोवीनसाठी मागणी करतील त्यांना ते निःशुल्क उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. कॅनडा, मेक्सिको व आफ्रिकी देशांसह जगातील किमान ५० देशांनी कोविन अॅपबाबत उत्सुकता दाखविल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ डॉ. आर. एस. शर्मा यांनी िदली.

loading image