कोविशील्ड लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी

Corona Vaccine
Corona Vaccinefile photo
Summary

दुसरी लाट ओसरल्याची चर्चा सध्या सुरु असली तरी निती आयोगाचे सदस्य डॉक्टर वीके पॉल यांनी मात्र अद्याप दुसरी लाट संपली नसल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जास्त फटका बसला. याच काळात एएफएमसीने एक अभ्यास केला. त्यानुसार कोविशिल्ड कोरोनापासून 93 टक्के सुरक्षित ठेवतं आणि मृत्यूदर 98 टक्क्यांपर्यंत कमी करते असा दावा करण्यात आला आहे. निती आयोगाचे सदस्य डॉक्टर वी के पॉल यांनी याबाबतचे निष्कर्ष एका पत्रकार परिषदेत सांगितले. एएफएमसीने हा अभ्यास 15 लाख डॉक्टर आणि कोरोना वॉरिअर्सवर केला.

पॉल म्हणाले की, ज्यांनी कोरोनाविरोधात कोविशील्डची लस घेतली होती त्यांच्यात 93 टक्के संसर्गापासून सुरक्षा मिळाल्याचं दिसून आलं. त्याच दरम्यान, मृत्यूदरसुद्धा 98 टक्के घटल्याचं आढळलं आहे. लस घेतल्यानं ससंर्ग कमी होतो पण त्याची खात्री देता येत नाही असंही पॉल यांनी सांगितलं.

Corona Vaccine
CBI चे माजी संचालक राकेश अस्थाना दिल्ली पोलिस आयुक्तपदी

लसीकरणात लशीची उपयुक्तता किती आहे याबाबत सांगताना पॉल म्हणाले की, लस घेतल्यानंतर संसर्ग होणारच नाही याची खात्री कोणतीही लस देणार नाही. मात्र संसर्ग रोखता येऊ शकतो आणि जवळपास नष्ट होतो. माझी विनंती राहील की सर्वांनी सावध रहावं, काळजी घ्यावी आणि लसीवर विश्वास ठेवा.

दुसरी लाट ओसरल्याची चर्चा सध्या सुरु असली तरी निती आयोगाचे सदस्य डॉक्टर वीके पॉल यांनी मात्र अद्याप दुसरी लाट संपली नसल्याचं म्हटलं आहे. अजुनही काही भाग चिंता वाढवणारे असल्याचं ते म्हणाले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, देशातील 22 जिल्ह्यांमध्ये 4 आठवड्यांपासून वाढ झाल्याचं दिसलं आहे. यात केरळमधील 7, मणिपूरमधील 5, मेघालयातील 3, अरुणाचल प्रदेशातील 3 आणि महाराष्ट्रातील 2 तर आसाम, त्रिपुरातील एका जिल्ह्याचा समावेश आहे.

Corona Vaccine
आसाम-मिझोराम सीमावाद शतकापासून

देशात 52 जिल्हे असे आहेत जिथं 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत आहे. युके, फ्रान्स, इटली, जपानमद्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. आपल्याला कोरोनाविरोधातील लढा सुरुच ठेवावा लागेल. पावसाळ्यात डास, पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका असतो. यामध्ये डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनियाचा धोका जास्त असतो. त्यामुळे यापासून काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनासोबत हे आजार आणखी धोकादायक ठरू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com