पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी कोवोवॅक्स या लसीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी कोवोवॅक्स लस भारतात कधी उपलब्ध होईल, याबाबतची अंदाजे तारीख दिली आहे. तसेच त्यांनी सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल आभार देखील मानले आहेत. पूनावाला यांनी गृहमंत्री अमित शहा यांची संसदेत भेट घेतली आहे. त्या दोघांमधील बैठक 30 मिनिटे चालली.
त्यांनी म्हटलंय की, सरकार आम्हाला पाठिंबा देतंय. कसल्याही प्रकारची आर्थिक अडचण नाहीये. मी पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. मोठ्यांसाठी कोवोवॅक्स ही लस ऑक्टोबरपर्यंत येईल, अशी मला आशा आहे. आम्ही नेहमीच लस उत्पादक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात राहिलो आहोत.
पुढे ते म्हणालेत की, कोवोवॅक्स ही दोन डोसची लस आहे. जेंव्हा कोवोवॅक्स लाँच होईल, तेंव्हाच त्याची किंमत देखील लोकांना कळेल. लहान मुलांसाठीची लस २०२२ च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होईल.
अनेक विकासशील देशात लसीकरणासाठी Novavax महत्वाची भूमिका बजावू शकते, असं अमेरिकेतील तज्ज्ञांनी सांगितलं आहे. भारतात लसीकरण निर्मिती करणारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया Novavax या लसीचीही निर्मिती करत आहे. भारतात निर्मिती केल्या जात असलेल्या या लसीला Covovax असं म्हटलं जातंय. Novavax चे मुख्य कार्यअध्यक्ष स्टेनली एर्क यांनी सांगितलं की, 'या दोन शॉटच्या लसीला 2 ते 8 डीग्री सेल्सियलच्या दरम्यान ठेवण्याची गरज असते. यामुळे लसीला स्टोअर करणे तसेच त्याची वाहतुक करणं सोपं होणार आहे. खासकरुन विकसनशील देशांमध्ये लसीचा पुरवठा वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भुमिका निभावण्याची आशा आहे. सुरुवातीला आम्ही लसीचे डोस गरीब आणि अति गरीब देशांमध्ये पाठवणार आहोत.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.