Vande Bharat Express
Vande Bharat Express Esakal

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसनं गाईला उडवलं, धडकेत वृद्धाचाही जागीच मृत्यू

वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात होण्याची ही पहिली घटना नाही

राजस्थानमधील अलवर शहरातील अरावली विहार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काली मोरी फाट्याजवळ वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत गायीसह एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दिल्लीहून अजमेरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला गाय धडकून सुमारे 30 मीटर अंतरावर पडली. यावेळी जवळच थोड्याशा अंतरावर उभ्या असलेल्या वृद्धालाही रेल्वेची धडक बसली. या अपघातात वृद्धासह गायीचाही मृत्यू झाला आहे. तर शिवदयाल शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून ते निवृत्त रेल्वे कर्मचारी होते.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. राजस्थान मधील पहिली वंदे भारत एक्सप्रेस अजमेरवरुन दिल्ली कँटपर्यंत चालेल. ही एक्सप्रेस आठवड्यातून फक्त सहा दिवस धावणार आहे. १३ एप्रिलपासून या मार्गावर या वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू झाली आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस धावल्यानंतर आता देशात 13 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या आहेत.

Vande Bharat Express
Rahul Gandhi: राहुल गांधींनी शासकीय बंगला केला रिकामा; बंगल्याची चावी लोकसभा सचिवालयाला करणार परत

वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी गेल्या वर्षी मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाला होता. या अपघातात गुजरातमधील आणंद मध्ये एका 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ एका गायीला रेल्वेने धडक दिली. या धडकेत रेल्वेचा पुढचा भाग तुटला. 29 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील आणंद मध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला एका गायीने धडक दिली होती.

Vande Bharat Express
Shivsena: '...अन् रोख 51 हजारांचं बक्षिस घेऊन जा', ठाकरे गटाचं गुलाबराव पाटलांना चॅलेंज

त्यावेळी अचानक गायींचा कळप दिसल्याचे रेल्वे आधिकाऱ्याने सांगितले होते. गुजरातमध्ये गायीबरोबरच वंदे भारत म्हशीच्या कळपाशीही टक्कर झाली होती. या दुर्घटनेत काही जनावरे दगावली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नवी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसलाही तांत्रिक बिघाडामुळे आग लागली होती आणि गाडीची चाके जाम झाली होती.

Vande Bharat Express
Ajit Pawar: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री… अजित पवारांचे पुण्यात बॅनर; राजकीय चर्चांना उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com