esakal | लसीकरण नोंदणीसाठी भारतीयांची घाई; CoWIN सर्वर क्रॅश

बोलून बातमी शोधा

cowin

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने 18 ते 45 वयोगटीतील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

लसीकरण नोंदणीसाठी भारतीयांची घाई; CoWIN सर्वर क्रॅश
sakal_logo
By
टीम ईसकाळ

नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने 18 ते 45 वयोगटीतील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. लसीकरणाची नोंदणी कोविन ऍप, उमंग ऍप आणि आरोग्य सेतूवर करणे बंधनकारक आहे. बुधवारी 4 वाजल्यापासून लोकांना लसीकरणासाठी नोंद करता येणार आहे. पण, एकाचवेळी अनेक लोकांच्या यावर नोंदणीसाठी उड्या पडल्याने वेबसाईट आणि ऍप क्रॅश झाल्याचं समोर आलं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत तक्रार केली आहे. शिवाय अनेकांनी ओटीपी मिळत नसल्याच्याही तक्रारी केल्या आहेत.

18 ते 45 वयोगटातील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 1 मेपासून या वयोगटातील सर्वच लोकांना लस देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांनी सरकारने सांगितलेल्या माध्यमावर लसीकरणासाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या पदरी निराशा पडल्याचं दिसून येत आहे. याधी 45 वर्षांपुढील व्यक्तींना नोंदणी करण्याची आवश्यकता होती. आता या व्यक्तींना नोंदणीशिवायही लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे. पण, 18 ते 45 वयोगटातील सर्वांना लसीकरणासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे.

केंद्र सरकारने याआधी 28 एप्रिलच्या 12 वाजल्यापासून लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु होईल, असं सांगितलं होतं. पण, नंतर हा कालावधी वाढवून दुपारी 4 वाजल्यापासून नोंदणी सुरु होईल, असं सांगितलं. अनेकांनी 4 वाजता आपली नोंदणी करण्यासाठी कोविन ऍप किंवा वेबसाईट सुरु केले. अनेकांना सर्व्हर डाऊनचा अनुभव आला. एकाचवेळी अनेक लोकांनी नोंदणीसाठी प्रयत्न केल्याने साईटवर मोठा ताण आला आहे.