
Joshimath : जोशीमठामध्ये भूस्सखलन! पंतप्रधान कार्यालयाने बोलावली तातडीची बैठक
Crackdown in Joshimath Uttarakhand
उत्तराखंडमधल्या जोशीमठ येथे मोठ्या प्रमाणावर जमिनीला भेगा पडलेल्या असून भूस्सखलन झालेलं आहे. जोशीमठाला भूस्खलन क्षेत्र घोषित करण्यात आलेलं आहे.
जमिनीला भेगा पडल्याने क्षतिग्रस्त घरांतील ६० पेक्षा जास्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. त्याच अनुषंगाने आज पंतप्रधान कार्यालयाने उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक संपन्न झाली.
हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....
जोशीमठ येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात आहेत. बचावकार्य करणाऱ्या चार टीम तिथे दाखल असल्याचं बैठीकमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं. सीमा प्रबंधन सचिव तथआ एनडीएमएचे सदस्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जातील, असं बैठीकमध्ये ठरलं आहे.
हेही वाचा: Sharad Pawar : अभ्यास सोडून आम्ही इतर ठिकाणीच पुढे असायचो; पवारांनी सांगितला पूनावालांसोबतचा किस्सा
शनिवारी जोशीमठच्या क्षतिग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. मदतकार्यामध्ये गती येण्यासाठी नियमांमध्ये सूट देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शिवाय पंतप्रधानांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.