kedarkantha
sakal
नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या शांत आणि तितक्याच रोमांचक ठिकाणाच्या शोधात असाल, तर उत्तराखंडमधील 'केदारकांठा' हे नाव सध्या ट्रेकर्सच्या पसंतीस उतरत आहे. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या काळात येथे ट्रेकर्सची मोठी गर्दी पाहायला मिळते. समुद्रसपाटीपासून १२,५०० फूट उंचीवर असलेल्या या शिखरावरून दिसणारा सूर्योदय तुमचा थकवा क्षणार्धात दूर करेल.
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या ट्रेकची माहिती दिली आहे.