
नवी दिल्ली (पीटीआय) : तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेट या खेळाचे ऑलिंपिकमध्ये पुनरागमन होणार, हे निश्चित झाल्यावर सुवर्णपदकाच्या शर्यतीत सहा संघांमध्ये संघर्ष होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस ऑलिंपिक स्पर्धेत पुरुष आणि महिला विभागांत प्रत्येकी सहा संघ असणार आहेत.