esakal | क्रिकेटपटू मनोज तिवारीची नवी इनिंग सुरु; ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेटपटू मनोज तिवारीची नवी इनिंग सुरु; ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश

तिवारी यांचा पक्ष प्रवेश हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा दिलासा ठरला आहे. कारण, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यापासून पक्षाच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपत प्रवेश केला आहे.

क्रिकेटपटू मनोज तिवारीची नवी इनिंग सुरु; ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

क्रिकेटपटू मनोज तिवारी याने आता राजकारणात आपली नवी इनिंग सुरु केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्याने बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनोजने स्वतः आपल्या ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. 

मनोजनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "आजपासून नवी सुरुवात होत आहे. तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे. यापुढे इन्स्टाग्रामवर माझं राजकीय  प्रोफाईल तुम्हाला पहायला मिळेल." या मजकुरानंतर त्यानं आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलची लिंकही शेअर केली आहे.

यापूर्वी माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. दरम्यान, शुक्ला यांनी जानेवारी २०२१ पक्षाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना आपल्याला आपल्या यापुढे क्रीडा उपक्रमांवर लक्ष्य केंद्रीत करायचं असल्यानं आपण राजकारणातून निवृत्त होत आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. 

दरम्यान, तिवारी यांचा पक्ष प्रवेश हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा दिलासा ठरला आहे. कारण, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यापासून पक्षाच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपत प्रवेश केला आहे. ममता बॅनर्जी यांना नुकताच आणखी एक मोठा झटका बसला. तृणमूलचे राज्यसभा खासदार दिनेश त्रिवेदी यांनी आपल्याला तृणमूलमध्ये गुदमरल्यासारखं होत असल्याचं सांगत नुकताच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

loading image