esakal | शहरी भागात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट - NCRB
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Against Women

शहरी भागात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट - NCRB

sakal_logo
By
सुधीर काकडे

शहरी भागांत महिलांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये (Crime Against Women) २१ टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये २०१९ च्या तुलनेत २०२० या वर्षात घट झाल्याचे दिसून आले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोमधून (NCRB) मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ साली महिला अत्याचाराची ४४,७८३ प्रकरणं नोंदविली गेली होती. तर २०२० या वर्षांत या आकड्यात मोठी घट झाली असून, ३५,३३१ प्रकरणं नोंदविली गेली आहेत. या आकडेवारीनुसार महिला अत्याचारात्या घटनांमध्ये २१.१ टक्क्याने घट झाल्याचे दिसते आहे.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबद्दलच्या तपशीलवार माहितीमधून असे समोर येते की, महिलांवर ३०.२ टक्के घटनांमध्ये पती किंवा नातेवाईकांकडून अत्याचार होतात. १९.७ घटना विनयभंगाच्या आहेत. १९ टक्के घटनांमध्ये महिलांचे अपहरण होते, तर ७.२ टक्के बलात्काराच्या घटना आहेत. दिल्लीमध्ये महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये २४.१८ टक्क्यांनी घट झाली. त्यानूसार २०१९ या वर्षात १२,९०२ प्रकरणं झाली होती, तर २०२० मध्ये हा आकडा ९,७८२ वर आला. मुबंईमध्ये देखील अशा घटनांच्या प्रमाणामध्ये घट झाल्याचे दिसून आले. त्यानूसार मूंबईत २०१९ मध्ये ६,५१९ महिला अत्याचाराची प्रकरणं नोंदविली गेली होती, २०२० मध्ये हा आकडा कमी होऊन तो ४,५८३ वर आला.

हेही वाचा: हरियाणा : 3 आठवड्यांत 7 मुलांचा मृत्यू; गावात भितीचे वातावरण

या काळात हुंडा बळीच्या ३५८ घटना घडल्या. त्यानूसार भा.द.वि.च्या कलम ३०४ - ब अंतर्गत दिल्लीमध्ये १०९, लखनऊमध्ये ४८, कानपुरमध्ये ३० आणि जयपुरमध्ये २६ घटना नोंदविल्या गेल्या आहेत. पतीकडून होणाऱ्या अत्याचाराच्या १०,७३३ घटना घडल्या आहेत. यापैकी २,५७० घटना दिल्लीत घडल्या. तर हैदराबाद आणि जयपुरमध्ये १, ०४३ घटना घडल्या आहेत.

loading image
go to top