शारीरिक संबंधानंतर तरुणानं लग्नास दिला नकार, दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

UP Crime News
UP Crime Newsesakal
Summary

तरुणानं दहावीच्या विद्यार्थिनीशी लग्नाच्या बहाण्यानं शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केले.

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मुलींवर होणारे अत्याचार कमी होण्याचं नाव घेत नाहीयत. बरेली येथून ताजं प्रकरण समोर आलंय. येथील सुभाष नगर परिसरात एका तरुणानं दहावीच्या विद्यार्थिनीशी लग्नाच्या बहाण्यानं शारीरिक संबंध बनवून अत्याचार केले, त्यानंतर विद्यार्थिनीनं लग्न करण्यास सांगितलं असता तरुणानं लग्नास नकार दिला. यानंतर पीडित मुलीनं आत्महत्या (Bareilly Girl Suicide) केलीय.

विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी (Bareilly Police) त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला. यानंतर मुलीच्या आईनं बरेलीच्या एसएसपीसह मुख्यमंत्री आणि महिला आयोगाकडं (Women Commission) तक्रार केलीय. बरेली पोलीस स्टेशनमध्ये मणिनाथ यांनी माहिती देताना सांगितलं की, त्यांची मुलगी दहावीत शिकत होती आणि पुष्पाचं बरेलीच्या सुभाष नगरमध्ये राहणार्‍या प्रखर सक्सेना नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. 3 वर्षांपूर्वीपासून लग्नाच्या बहाण्यानं प्रखरनं मुलीचं शारीरिक शोषण केलं आणि त्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याचा आरोप लक्ष्मी देवी यांनी केलाय.

UP Crime News
हृदयद्रावक! सेनेगल हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

लक्ष्मी देवी यांनी आरोप केलाय की, कुटुंबीयांना मुलीच्या गर्भपाताची माहिती मिळाली, तेव्हा कुटुंबीयांनी प्रखर आणि त्याच्या कुटुंबावर लग्नासाठी दबाव टाकला. मात्र, प्रखरनं लग्नास नकार दिला. हा प्रकार विद्यार्थिनीला समजल्यानंतर मुलीनं 14 मे रोजी गळफास लावून आत्महत्या केलीय. विद्यार्थिनीच्या आत्महत्येची संपूर्ण घटना पोलिसांना कळवण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन केलंय. पोलिसांनी दिलेली तक्रार बदलून आरोपीला वाचवल्याचा आरोप मृताची आई लक्ष्मीदेवी यांनी केलाय. पोलीस आरोपींना खूप मदत करत आहेत. वैतागलेल्या मुलीच्या आईनं बरेलीच्या एसएसपी आणि महिला आयोगाकडं तक्रार करून न्यायाची याचना केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com