
पाटणा : येथील खासगी रुग्णालयात खून प्रकरणातील दोषी व्यक्तीची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चंदन नावाची व्यक्ती बक्सर जिल्ह्याची रहिवासी असून ती उपचारासाठी पॅरोलवर तुरुंगाबाहेर आली होता. पाच जणांच्या टोळक्याने रुग्णालयामध्ये घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. चंदनला गंभीर जखमी अवस्थेत अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे उघड झाले आहे. या घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.