
उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे एका १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या १० दिवसांत आरोपपत्र दाखल केले, तर पॉक्सो कोर्टाने केवळ १६ तारखांत सुनावणी पूर्ण करून आरोपीला आजीवन तुरुंगवासची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पोलिसांच्या तत्परतेने आणि कोर्टाच्या जलद कारवाईने पीडितेला अवघ्या ५८ दिवसांत न्याय मिळाला. या कामगिरीमुळे गाझीपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.