Kerala human sacrifice case : बळीविधीनंतर आरोपींकडून नरमांस भक्षण

केरळमधील नरबळी घटना : पोलिस आयुक्तांची माहिती; तपासात अघोरी कृत्य उघडकीस
crime news Kerala human sacrifice case investigation revealed a horrifying human sacrifice
crime news Kerala human sacrifice case investigation revealed a horrifying human sacrifice

तिरुअनंतपुरम : केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्यात धनलाभाच्या हेतूने एका डॉक्टर दाम्पत्याकडून दोन महिलांचा बळी देण्यात आला. या दोन्ही महिलांच्या मृतदेहाचे तुकडे पुरण्यात आले होते. नरबळीचे अमानवीय कृत्य करणाऱ्या तिघा मारेकऱ्यांनी मृत महिलांचे मांस शिजवून खाल्ल्याचेही उघड झाले आहे. शहर पोलिस आयुक्त नागराजू यांनी ही माहिती बुधवारी दिली. नरबळी दिल्याने आपल्याला खूप धन येईल या अंधविश्वासापोटी एलनथूर येथील स्थानिक फिजिओथेरेपिस्ट भगवाल सिंह आणि त्याची पत्नी लैला या दोघांनी तांत्रिक असल्याचे भासविणाऱ्या मोहंमद शफी ऊर्फ राशीद याची मदत घेऊन दोन महिलांची गळा दाबून हत्या केली. या तिघांना अटक केल्यानंतर त्यांनी केलेले अमानवीय कृत्य उघडकीस आले. त्‍यांना २६ ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. भगवाल याच्‍या घरात पोलिसांना दोन महिलांचे मृतदेहाचे तुकडे आढळले. आरोपींनी त्याचे ५६ तुकडे केले होते. मृत महिलांच्या शरीरातून बाहेर पडणारे रक्त गोळा करून ते घराच्या परिसरात शिंपडण्यात आले होते. नरबळीनंतर आणखी मोठा लाभ होण्यासाठी त्यांचे मांस शिजवून खाण्याचा सल्ला शफीने लैलाला दिला होता.

रोसेलिना आणि पद्मा अशी बळी दिलेल्या महिलांची नावे आहेत. रोझेलिना जूनपासून तर पद्मा सप्टेंबरपासून बेपत्ता होती. त्या रस्त्यावर लॉटरीची तिकिटे विकून उदरनिर्वाह करीत होत्या. त्या अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल झाली होती. याबाबत तपास करीत असताना त्यांचा बळी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले. भगवाल सिंह आणि लैला या दांपत्याची आर्थिक स्थिती खालावलेली होती. याचकाळात फेसबुकवर त्यांची ओळख श्रीदेवी नावाच्या महिलेशी झाली. तांत्रिक मोहंमद शफी हाच श्रीदेवी नावाने प्रोफाईल बनवून भगवाल सिंहच्या संपर्कात होता. त्याने शफी नाव सांगून दांपत्याची भेट घेतली. धनलाभ होण्यासाठी नरबळी द्यायला हवा, असे त्याने सांगितले. भगवाल सिंहने त्याला दोन्ही खुनांसाठी प्रत्येकी साडेतीन लाख रुपये दिले होते. यानंतर महिलांचा शोध सुरू झाला होता. या कटाचे सर्व नियोजन शफीने केले होते. लैंगिक दृश्यांचा समावेश असलेल्या चित्रपटात काम मिळेल, असे सांगून शफीने संबंधित महिलांना भगवाल सिंहच्या घरी आणले होते.

‘भगवंतसिंह माकप’चा सदस्य?

फिजिओथेरपिस्ट असलेला भगवंतसिंह या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा शाखा समिती सदस्य होता. नरबळीच्या घटनेनंतरही अगदी गेल्या आठवड्यापर्यंत तो पक्षाच्या अनेक कार्यक्रमात सहभाग घेत होता. तो पक्षात सक्रिय असल्याच्या वृत्त ‘माकप’ने फेटाळले आहे.

विकृत शफी

शफीवर चोरीसह दहा गुन्हे आहेत. त्याने सहावीत शाळा सोडली. ७५ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या आरोपावरून २०२०मध्ये त्याच्यवर गुन्हा दाखल होऊन तो तुरुंगात गेला होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. शफीचे एर्नाकुलम येथे त्याचे हॉटेल आहे. गुन्ह्यांसाठी तो सोशल मीडिया वापरत करीत होता. त्याने त्याच्या पत्नीचा दूरध्वनी क्रमांक वापरून श्रीदेवी नावाने खोटे फेसबुक अकाउंट सुरू केले होते. शफीच्या पत्नीचा या गुन्ह्यात सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. तो अतिशय विकृत व लांगूनचालन करणारा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com