Crime News : ड्रग रॅकेट पकडण्यासाठी NCB ने केला इस्रोच्या उपग्रह वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drugs case

Crime News : ड्रग रॅकेट पकडण्यासाठी NCB ने केला इस्रोच्या उपग्रह वापर

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने द्वारका येथील जोडिया गावात ड्रग पकडण्यासाठी प्रथमच इस्रोच्या ADRIN उपग्रहाच वापर केला आहे. नोव्हेंबर 2021मध्ये 600 कोटी रुपयांच्या मोरबी येथील अमली पदार्थांच्या तस्करीत मुख्य आरोपी इसा रावने अवैध व्यापारातून संपत्ती कमावली आहे. याचा तपास करण्यासाठी एनसीबीने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

एनसीबीने मंगळवारी रावची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जप्तीचे आदेश जारी केले. राव यांनी जी मालमत्ता जमा केली आहे. त्यासाठी स्थानिक पंचायतीकडे कोणतेही कागदपत्र सादर केले नाहीत. त्यामुळे जोडिया गावात मालमत्ता कशी जमा केली हे जाणून घेण्यासाठी एनसीबीने इस्रोच्या डेटा प्रोसेसिंग रिसर्च इन्स्टिट्यूटची मदत घेतली.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

एनसीबीने 2019 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान मालमत्तेत केलेल्या बदलांचे निरीक्षण केले आणि तो तिथे अवैध व्यवसाय चालवत आहे. एनसीबीने राव यांच्या मालमत्तेच्या पडताळणी करण्यासाठी गुगल अर्थचाही वापर केला.

15 नोव्हेंबर 2021 रोजी गुजरात एटीएसने मोरबी येथील घरातून 600 कोटी रुपये किमतीचे 120 किलो हेरॉईन जप्त केल्यानंतर राव लपून बसला होता. हेरॉईन हे गुजरात किनार्‍यामार्गे भारतात आले. यासाठी तीन जणांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा: Baba Ramdev : बाबा रामदेव यांच्या 'पतंजली'ला दणका; 'या' देशाने कंपनीला टाकलं काळ्या यादीत

पुढील तपासात 776.5 कोटी रुपयांचे आणखी 155.3 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आणि नायजेरियन नागरिकासह 14 जणांना अटक करण्यात आली. त्यातही राव याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

हेरॉईन पाकिस्तानी ड्रग माफियांकडून विकत घेण्यात आले होते. गेल्या आठवड्यात ऑक्टोबरमध्ये मध्य समुद्रात हेरॉईनची डिलिव्हरी करण्यात आली होती. हा माल पंजाबला पोहोचवायचा होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ATS अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ड्रग्ज भारतात आल्यानंतर राव नोव्हेंबर 2021 मध्ये भारतातून पळून गेला होता. दाऊद इब्राहिम टोळीने त्याला कराचीमध्ये आश्रय दिला होता. त्याचे शेवटचे लोकेशन ट्रेस करण्यात आले होते. डिसेंबरमध्ये हे प्रकरण एनसीबीकडे सोपवण्यात आले आहे.

टॅग्स :crimeNCBdrug case