Narendra Modi : अण्वस्त्रे नष्ट करण्याची विरोधकांची इच्छा ; बारमेरमध्ये पंतप्रधानांची टीका,देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न

‘‘देशाची फाळणी करणाऱ्या मुस्लिम लीगचा ठसा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर उमटला आहे. याच इंडिया आघाडीचा घटक असलेल्या अन्य एका पक्षाने देशाची अण्वस्त्रेच नष्ट करण्याची धोकादायक घोषणा केली आहे.
Narendra Modi
Narendra Modi sakal

बारमेर (राजस्थान) : ‘‘देशाची फाळणी करणाऱ्या मुस्लिम लीगचा ठसा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर उमटला आहे. याच इंडिया आघाडीचा घटक असलेल्या अन्य एका पक्षाने देशाची अण्वस्त्रेच नष्ट करण्याची धोकादायक घोषणा केली आहे.

आपले दोन शेजारी हे अण्वस्त्रसज्ज असताना आपण अण्वस्त्रे नष्ट करावीत का? देशालाच कमकुवत करणारी ही कसली आघाडी आहे,’’ अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित सभेत केली.

Narendra Modi
Loksabha Election 2024 : विरोधी पक्षांना समान संधी नाही ; निवृत्त अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त

काँग्रेस पक्ष हा देशविरोधी शक्तींसोबत उभा असून इंडिया आघाडी देशाला कमकुवत करते आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेसची विचारधाराच विकासविरोधी आहे. सीमावर्ती भागामध्ये पायाभूत सेवांच्या उभारणीकडेही काँग्रेसने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. भाजपने मात्र सत्तेमध्ये येताच सर्वप्रथम या गावांचा विचार केला.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com